आपला जिल्हा

शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिकचा राज्यात दबदबा

शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिकचा राज्यात दबदबा

सलग तेराव्या वर्षी एका शाळेचे सर्वाधिक १२९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; घनश्याम ढेपे राज्यात अकरावा

Kopargaon vijay kapse दि १३ ऑगस्ट २०२६ : शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही राज्यात सर्वोत्तम कामगिरी करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. तब्बल १२९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून घनश्याम ढेपे याने २७६ गुणांसह राज्यात अकरावा क्रमांक पटकावला आहे.

जाहिरात

या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे तब्बल १९ लाख ३५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आत्मा मालिकने सलग तेराव्या वर्षी पटकावला आहे.

जाहिरात

याबाबत माहिती देताना प्राचार्य निरंजन डांगे म्हणाले की, इयत्ता पाचवी, सातवी आणि आठवीची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. त्यामध्ये इयत्ता पाचवीचे १०, सातवीचे २२ आणि आठवीचे तब्बल ९७ विद्यार्थी असे एकूण १२९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.

आजपर्यंत या गुरुकुलातील ८१७ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून त्यापैकी २२ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यंदाच्या राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांमध्ये घनश्याम ढेपे (२७६), श्रेयश धावडे (२६०), शिवम जाधव (२५८), साहिल पवार (२५६), श्रीकांत कोतकर (२५४), प्रथमेश सांगळे (२५२), गितेश उधाण (२५२), कृष्णा धुमाळ (२५०), स्वरा लांडगे (२५०), आयुष वाळुंज (२५०), युवराज डोके (२४८), आयुष कानडे (२४८), पवन मराठे (२४२), रोशन पवार (२४२), अभिमन्यू कानवडे (२४०), गजानन म्हस्के (२४०), सिद्धार्थ साळवी (२४०), अध्ययन मुदगुल (२३८), आविष्कार वाकळे (२३८), साई घोडके (२३४), आराध्या गुरसळ (२३४) आणि गौरव मैंड (२३२) यांचा समावेश आहे.

जाहिरात

या विद्यार्थ्यांना विषय शिक्षक पंकज गुरसळ, रिना कोरे, शिवम तिवारी, सुवर्णा ढगे, रोहिणी होन, वैशाली गोरे, अश्विनी टुपके, अनिल सोनवणे, सूर्यकांत कराळे, दीपाली भोसले, दिनेश नाईक, रूपाली होन, मनोहर वैद्य, पुनम राऊत, सुलोचना गाढवे, अनिल डुकरे व कल्याणी जपे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी व विश्वस्तांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.

 

 

 

आत्मा मालिक पॅटर्न” पुन्हा सिद्ध!

 आत्मा मालिक पॅटर्न पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. विशेष तयारी वर्ग, सुपर नाईट अभ्यासिका, सुवर्ण पहाट अभ्यासिका, स्मार्ट संडे उपक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दीर्घ सुट्यांमध्ये विशेष तयारी शिबिरे, सराव परीक्षांचे नियोजन, विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन वर्ग, विद्यार्थी दत्तक योजना तसेच विद्यार्थी व शिक्षक प्रोत्साहन योजना अशा विविध उपक्रमांचे हे फलित आहे.नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट

 

 

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे