आपला जिल्हा

अमृतवाहिनी विद्यापीठाला शासनाची मान्यता; प्रवेश प्रक्रिया सुरू

अमृतवाहिनी विद्यापीठाला शासनाची मान्यता; प्रवेश प्रक्रिया सुरू

संगमनेरच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी झेप; कॉस्मेटोलॉजी अभ्यासक्रमापासून विद्यापीठाची सुरुवात

Sangmner vijay kapse दि १३ ऑगस्ट २०२६: ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले अमृतवाहिनी विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होत आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठातील कॉस्मेटोलॉजी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अभियांत्रिकी, व्यवस्थापनासह विविध प्रमाणपत्र, पदविका व पदवी अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

जाहिरात

या विद्यापीठामुळे संगमनेरसह उत्तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्याधारित शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासोबतच आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा विद्यापीठ स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.

जाहिरात

२ जुलै २०२६ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमृतवाहिनी विद्यापीठाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संबंधित विधेयकाला विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर विद्यापीठाच्या कार्याला अधिकृत सुरुवात झाली.

जाहिरात

पाच दशकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वारसा

अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेची स्थापना १९७८ मध्ये सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, या उद्देशाने सुरू झालेल्या संस्थेने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दशकांत शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत भक्कम स्थान निर्माण केले आहे.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, तंत्रशिक्षण तसेच शालेय शिक्षण अशा विविध क्षेत्रांत संस्थेचा विस्तार झाला आहे. येथून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देश-विदेशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहेत, असे संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू देशमुख यांनी सांगितले.

अमृतवाहिनी परिवारात अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), एमबीए, फार्मसी, कृषी महाविद्यालय, फूड टेक्नोलॉजी, ज्युनियर कॉलेज, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, निडो इंटरनॅशनल आदी सुमारे बारा शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.

जागतिक दर्जाच्या शिक्षणावर भर

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारे शिक्षण, संशोधनाच्या व्यापक संधी आणि जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यावर अमृतवाहिनी विद्यापीठाचा भर राहणार आहे. विद्यापीठात अत्याधुनिक प्रयोगशाळा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि संशोधनासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांसोबतच परदेशातील विद्यापीठांशी सामंजस्य करार करून आंतरराष्ट्रीय प्राध्यापक व तज्ज्ञांचा सहभाग वाढविण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे संशोधन, नवोपक्रम, उद्योग-संस्था सहकार्य, कौशल्याधारित शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

जाहिरात

विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख शिक्षणाची संधी”

“अमृतवाहिनी विद्यापीठाच्या स्थापनेमुळे आमची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. मात्र, या माध्यमातून काळाशी सुसंगत आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी संगमनेरमध्ये उपलब्ध होतील, असा आम्हाला विश्वास आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख शिक्षण देण्यासाठी अमृतवाहिनी विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल.”

शरयू देशमुख

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे