जनगणना प्रगणकांचे मानधन तातडीने द्या; शिक्षक भारतीचे तहसीलदारांना निवेदन

जनगणना प्रगणकांचे मानधन तातडीने द्या; शिक्षक भारतीचे तहसीलदारांना निवेदन
जनगणना प्रगणकांचे मानधन तातडीने द्या; शिक्षक भारतीचे तहसीलदारांना निवेदन

Kopargaon vijay kapse दि १३ ऑगस्ट २०२६ : जनगणना प्रगणक म्हणून प्रथम टप्प्यातील कामकाज पूर्ण केलेल्या शिक्षकांचे प्रलंबित मानधन तातडीने त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, या मागणीसाठी कोपरगाव तालुका शिक्षक भारती शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले.
जनगणनेच्या कामात शिक्षकांनी जबाबदारीने सहभाग घेऊन प्रथम टप्प्यातील कामकाज पूर्ण केले आहे. मात्र, या कामाचे मानधन अद्याप अनेक शिक्षकांना मिळालेले नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित सर्व शिक्षकांना मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी तहसीलदार महेश सावंत यांनी शिक्षकांच्या मागणीची दखल घेत, लवकरात लवकर सर्व संबंधित शिक्षकांचे मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष प्रा. दिगंबर देसाई, ज्युनिअर कॉलेज तालुकाध्यक्ष नरेंद्र लहिरे, कला अध्यापक संघाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष तसेच अहिल्यानगर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक अतुल कोताडे, संजय गडकर, विकास भागवत, नितीन शेटे, महेंद्र काळंगे, गोकुळ जपे, मुकुंद हाडोळे, गजानन शेटे, कैलास थोरात, दिलीप तुपसैंदर, निलेश बडजाते, निलेश होन, पंकज जगताप, योगेश गवळे, संजय बर्डे, श्याम बच्चाव, सचिन डोळे, श्रीकांत डांगे, राहुल चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.




