राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी स्वप्निल पवार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी स्वप्निल पवार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी स्वप्निल पवार

Kopargaon vijay kapse दि १३ ऑगस्ट २०२६: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी युवा कार्यकर्ते स्वप्निल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांनी ही नियुक्ती केली असून, नियुक्तीचे पत्र आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नुकतेच स्वप्निल पवार यांना प्रदान करण्यात आले.

स्वप्निल पवार हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून, गेल्या दोन वर्षांपासून युवक शहराध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम पाहिले आहे. या काळात त्यांनी मोठ्या संख्येने युवकांचे संघटन करत विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविले. त्यांच्या संघटन कौशल्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांचे खंदे समर्थक म्हणूनही स्वप्निल पवार यांची ओळख आहे. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून कोपरगाव शहरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच युवकांना पक्षाशी जोडण्यावर भर देणार असल्याचे सांगण्यात आले.
या नियुक्तीबद्दल खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष बापू रांधवणे, रिंकू मगर, दिनेश पवार, सुनील वर्पे, निखिल थोरात, तानाजी जाधव, बाळासाहेब चव्हाण, माजिद पठाण, ऋतुराज काळे, बापू वढणे, ओंकार वढणे, निलेश शिंदे, शुभम गवारे आदींनी स्वप्निल पवार यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



