आपला जिल्हा

स्लोवाकिया येथील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी विवेक नायकल यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड

स्लोवाकिया येथील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी विवेक नायकल यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड

स्लोवाकिया येथील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी विवेक नायकल यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड

Kopargaon vijay kapse दि १४ ऑगस्ट २०२६: युरोपातील स्लोवाकिया येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे इंटरनॅशनल कोच श्री. विवेक नायकल यांची भारतीय कुस्ती महासंघ व भारतीय ऑलिम्पिक संघाच्या वतीने फ्री स्टाईल कुस्ती संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

जाहिरात

युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक कुस्ती संघटनेच्या मान्यतेने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय पैलवानांची तयारी करून घेण्याबरोबरच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी विवेक नायकल यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जाहिरात

यापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या लेव्हल-२ इंटरनॅशनल कोचिंग कोर्समध्ये त्यांनी ‘एफ’ श्रेणीत उत्तम यश संपादन केले आहे. तसेच २०२४ मध्ये अल्बेनिया-युरोप येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेतही त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.

जाहिरात

श्री. विवेक नायकल हे सध्या प.पू. आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठाच्या कुस्ती केंद्रात प्रमुख कोच म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल आत्मा मालिक परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे