तुकाराम मुंढे यांच्या कार्यावर आधारित अमोल निर्मळ यांचे आकर्षक फलक लेखन

तुकाराम मुंढे यांच्या कार्यावर आधारित अमोल निर्मळ यांचे आकर्षक फलक लेखन
तुकाराम मुंढे यांच्या कार्यावर आधारित अमोल निर्मळ यांचे आकर्षक फलक लेखन

राहाता vijay kapse दि १४ ऑगस्ट २०२६: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, पिंपरी निर्मळ येथील कलाध्यापक अमोल निर्मळ यांनी आपल्या कलाकौशल्यातून अभिनव व प्रेरणादायी फलक लेखन साकारले आहे.

१५ ऑगस्ट २०२६ या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनहिताच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्यावर आधारित हा फलक तयार करण्यात आला आहे. “सुरक्षित अन्न आणि प्रभावी औषध – निरोगी भारताची होय सुरुवात” तसेच “सुरक्षित अन्न, निरोगी जनता, प्रभावी औषध – आमचा संकल्प” अशा प्रभावी संदेशांतून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

फलकावर तिरंगा, स्वातंत्र्याचे प्रतीक असलेले कबूतर, उत्साही युवक-युवतींच्या आकर्षक आकृती, सुरक्षित अन्न व औषधांचे प्रतीक तसेच तुकाराम मुंढे यांचे सुंदर रेखाचित्र साकारण्यात आले आहे. “स्वातंत्र्याचा अभिमान, जबाबदारीची जाणीव” हा संदेशही फलकाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
संपूर्ण फलकाची रचना रंगीत खडूंच्या साहाय्याने करण्यात आली असून, त्यामध्ये कलात्मकता, देशभक्ती आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे. अमोल निर्मळ यांनी यापूर्वीही विविध सामाजिक विषयांवर फलक लेखनाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी फलक लेखनाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.




