आपला जिल्हा

संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे रविवारी कोपरगावात आयोजन

संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे रविवारी कोपरगावात आयोजन

संत महिमा व सावतामहाराजांच्या जीवनचरित्रावर होणार प्रवचन; रमे‍शगिरीजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

Kopargaon vijay kapse दि १४ ऑगस्ट २०२६ : संत शिरोमणी सावतामहाराज यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करण्यासाठी तसेच संत महिमा आणि सावतामहाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राचा जागर करण्यासाठी संजीवन समाधी सोहळ्याचे रविवारी, दि. १६ ऑगस्ट रोजी भव्य आयोजन करण्यात आले आहे. कोपरगाव येथील माळी बोर्डिंग, कोर्ट रोड येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे.

जाहिरात

संत सावतामहाराज हे वारकरी संप्रदायातील संतपरंपरेतील एक महान संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भक्ती, साधना, सेवाभाव आणि समतेच्या विचारांचा समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या जीवनचरित्रातून समाजाला मिळणारा भक्ती, श्रमप्रतिष्ठा आणि मानवसेवेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यास प.पू. रमेशगिरीजी महाराज, मठाधिपती, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम, बेट, कोपरगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी शिवभक्त भाऊपाटील, त्र्यंबकेश्वर यांचे संत महिमा व संत सावतामहाराजांच्या जीवनचरित्रावर प्रभावी प्रवचन होणार आहे.

जाहिरात

कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्मितीसाठी ह.भ.प. दत्ता महाराज वैद्य, निफाड यांची संगीत साथ, अंबादास कानडे, नाशिक यांची संतकवी सेवा तसेच ह.भ.प. गोपाळ महाराज, भाऊसाहेब नगर यांचे तबलावादन लाभणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक रंगत प्राप्त होणार आहे.

महाप्रसादाचे आयोजन

सोहळ्यानंतर दुपारी १२ वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद सेवेसाठी श्री. राजेंद्र हरीभाऊ बोरावके व श्री. गौतम विठ्ठल टिळेकर यांचे सहकार्य लाभणार आहे.

या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी महात्मा फुले मंडळ, माळी बोर्डिंग तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळ, कोपरगाव यांचे सहकार्य लाभत आहे. परिसरातील भाविक, संतप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पावन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

गरजू रुग्णांना वैद्यकीय साहित्याची मदत

 

 

सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने  महात्मा फुले मंडळ यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विरेंन बोरावके यांच्या अध्यक्षतेखाली ऑर्थोपेडिक सेंटर कोपरगाव यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना बेड, वॉकर व व्हीलचेअर विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमासोबतच समाजसेवेचा संदेशही महात्मा फुले मंडळ यांच्या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण : माळी बोर्डिंग, कोर्ट रोड, कोपरगाव.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे