आपला जिल्हा

संजीवनी अकॅडमीला राष्ट्रीय मॉडेल युनायटेड नेशन्स परिषदेत उपविजेतेपद

संजीवनी अकॅडमीला राष्ट्रीय मॉडेल युनायटेड नेशन्स परिषदेत उपविजेतेपद

१८ विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रभावी वक्तृत्व, राजनैतिक कौशल्य आणि जागतिक प्रश्नांच्या आकलनाचे प्रदर्शन

Kopargaon vijay kapse दि १४ ऑगस्ट २०२६ : ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील ॲमिटी युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित प्रतिष्ठित ‘मॉडेल युनायटेड नेशन्स (MUN) राष्ट्रीय परिषद २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या १८ विद्यार्थ्यांनी सहभागी होत उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्व, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे सखोल आकलन, चिकित्सक विचार, राजनैतिक कौशल्य आणि विचार मांडणीच्या माध्यमातून संजीवनी अकॅडमीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले.

जाहिरात

ॲमिटी युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. देशभरातील नामांकित शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग घेतला.
‘महाभारत’ संकल्पनेवर आधारित स्पर्धेत जान्हवी अनुप पटेल, विहान समाधान दहिकर, कार्तिक चंद्रशेखर चांदगुडे, आरोही अमोल कुलकर्णी आणि प्रियांशु प्रवीण हिरे यांनी ‘संयुक्त राष्ट्र महिला स्थिती आयोग’ (UNCSW) आधारित विषयावर प्रभावी विचार मांडत विशेष प्रावीण्य मिळविले.

जाहिरात

याच स्पर्धेत वीरा योगेश कोठारी, पलक विनायक बोधक, देवाशिष रावसाहेब शेंडगे, ओवी विकास आघाव, अथर्व अश्विनकुमार टिळेकर आणि श्रीहर्ष किसन थेटे यांनी सहभाग नोंदविला. तसेच UNCSW संकल्पनेवर आधारित स्पर्धेत राजवी रश्मी शर्मा, शर्विल योगेश खैरनार, सुरभी संतोषकुमार कोकणे, सई धनंजय कुंभार, गार्गी योगेश शूल, श्रेयसी निलेश गायकवाड आणि संविदा अमोल जोशी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातूनच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान, जागतिक घडामोडींची माहिती, आत्मविश्वासाने विचार मांडण्याची संधी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे. त्याचेच फलित म्हणून संजीवनीचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करीत आहेत.

जाहिरात

या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. यावेळी डॉ. आर. एस. शेंगडे, डॉ. सुधांशु भट, सुधा सुब्रमण्यम, अनुश्रीता सिंग आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संजीवनी अकॅडमीचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थीवर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल युनायटेड नेशन्स स्पर्धेत केलेली उल्लेखनीय कामगिरी ही संपूर्ण संजीवनी परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्वासोबतच आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे सखोल आकलन, चिकित्सक विचार, नेतृत्वगुण आणि राजनैतिक कौशल्य यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान, जागतिक घडामोडींची जाणीव आणि आत्मविश्वासाने विचार मांडण्याची संधी मिळावी, हा संजीवनी अकॅडमीचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. राष्ट्रीय स्तरावर संजीवनीचे नाव उंचावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यात त्यांनी मोठी स्वप्ने पाहून देशासाठी सक्षम, जबाबदार आणि संवेदनशील नेतृत्व घडवावे, हीच अपेक्षा आहे.”
डॉ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी अकॅडमी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे