आरडीएसएसअंतर्गत प्रलंबित वीज कामांना गती,आमदार विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश
नवले वस्ती गावठाण, सुराळकर वस्ती व नवीन कॅनल गावठाणातील नागरिकांना दिलासा
Kopargaon vijay kapse दि १९ ऑगस्ट २०२६–कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश सबस्टेशनअंतर्गत आरडीएसएस योजनेतील प्रलंबित वीज कामांना आता गती मिळाली असून, नवले वस्ती गावठाण, सुराळकर वस्ती आणि नवीन कॅनल गावठाण येथील नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. या कामांसाठी आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महावितरणच्या अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कार्यवाहीला गती दिली आहे. आर डी एस एस योजनेची गँग उपलब्ध नसल्यामुळे ही कामे रखडली होती त्याला आता गती मिळाली आहे.जाहिरात
नवले वस्ती गावठाण डीटीसीचे काम मागील सुमारे तीन महिन्यांपासून प्रलंबित होते. या कामातील सात पोल उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, येत्या आठ दिवसांत डीटीसी कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सुमारे ५० ते ६० घरांना शेती वाहिनीऐवजी गावठाण वाहिनीवरून वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
सुराळकर वस्ती डीटीसीचे कामदेखील सुमारे चार महिन्यांपासून प्रलंबित होते. नवीन डीटीसीचे काम पूर्ण झाले असून, एलटी बाजूचे चार पोल उभारण्यात आले आहेत. लाईन ओढण्याचे काम पूर्ण करून येत्या आठ दिवसांत डीटीसी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे ३० ते ४० घरांना शेती वाहिनीवरून गावठाण वाहिनीवर वीजपुरवठा मिळणार आहे.जाहिरात
तसेच नवीन कॅनल गावठाण, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील डीटीसीचे काम सुमारे चार महिन्यांपासून प्रलंबित होते. हे कामही आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून, येत्या चार दिवसांत सुमारे २० ते २५ व्यावसायिक ग्राहकांना गावठाण वाहिनीवरून वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
या तिन्ही कामांमुळे संबंधित गावठाणातील नागरिक व व्यावसायिक ग्राहकांना अधिक सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. शेती वाहिनीवरील भार कमी होऊन गावठाणातील वीजपुरवठ्याची सुलभता आणि स्थैर्य सुधारण्याची अपेक्षा आहे.जाहिरात
प्रलंबित कामांचा सातत्याने आढावा घेत, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ती मार्गी लावण्याचा आमदार विवेक कोल्हे यांचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांना केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष सुविधा मिळाल्या पाहिजेत, या भूमिकेतून ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.