आपला जिल्हा

शिष्यवृत्ती परीक्षेत सह्याद्री विद्यालयाची तालुक्यात बाजी

शिष्यवृत्ती परीक्षेत सह्याद्री विद्यालयाची तालुक्यात बाजी

शिष्यवृत्ती परीक्षेत सह्याद्री विद्यालयाची तालुक्यात बाजी

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १९ ऑगस्ट २०२६ : शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी, सातवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाने घवघवीत यश संपादन करीत तालुक्यात आपला दबदबा कायम राखला आहे. विद्यालयातील तब्बल २२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरून गुणवत्ता यादीत झळकले, अशी माहिती मुख्याध्यापक एस. एम. खेमनर यांनी दिली.

माजी शिक्षणमंत्री तथा संस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात आणि संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री विद्यालयाने गुणवत्तेचा आपला अग्रक्रम कायम राखला आहे. यामध्ये इयत्ता आठवीचे ९, इयत्ता सातवीचे ७ तर इयत्ता पाचवीचे ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.

जाहिरात

इयत्ता आठवी : कुटे साईशा बाबासाहेब (२५०), गंभीरे उत्कर्ष गणपत (२५०), सानप विवेक वेणूनाथ (२४४), वर्पे कार्तिकी विलास (२४२), आहेर ज्ञानेश्वरी राम (२२०), ढाकणे प्रतीक नानासाहेब (२२०), वाकचौरे योगेश यश (२१८), थोरात सायरा संतोष (२१६) आणि आभारी संस्कृती बाळासाहेब (२१४) यांनी उल्लेखनीय गुण मिळविले. या विद्यार्थ्यांना वीरेश नवले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता सातवी : पवार सर्वेस प्रल्हाद (२६६), कडलग आयुष संजय (२४६), खेमनर हर्षवर्धन सुभाष (२४६), वाकचौरे अर्णव अनिल (२४४), हासे अद्वैत भारत (२४०), हिरे खुशी गणपत (२३०) आणि सरोदे कौस्तुभ गणेश (२२०) यांनी यश मिळविले. त्यांना सरला माळी, मयुरी वायाळ, सोनाली पठारे व आरती मोहिते यांनी मार्गदर्शन केले.

इयत्ता पाचवी : सानप चेतना वेणूनाथ (२३०), खाडे हेरंब एकनाथ (२२८), महाले श्लोक मनोज (२२४), पचपिंड आयुष्य योगेश (२०६) आणि उगले रोहिणी विलास (२०६) यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना शरद नवले व अजीम शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात, चेअरमन आमदार डॉ. सुधीर तांबे, सेक्रेटरी सुमंतजी कोल्हे, आमदार सत्यजीत तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष मैथिली तांबे, खजिनदार अॅड. ज्ञानेश्वर सांगळे, संचालक प्रा. बाबा खरात, मुख्याध्यापक एस. एम. खेमनर, उपमुख्याध्यापिका एस. ए. दिघे, पर्यवेक्षक के. डी. देशमुख, पर्यवेक्षक ए. टी. दिघे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे