आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये IIT-JAM व GATE परीक्षेतून उज्ज्वल करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये IIT-JAM व GATE परीक्षेतून उज्ज्वल करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये IIT-JAM व GATE परीक्षेतून उज्ज्वल करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन

Kopargaon vijay kapse दि २४ ऑगस्ट २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज (एस.एस.जी.एम. कॉलेज), कोपरगाव येथे आयोजित ‘IIT-JAM व GATE Exam Awareness’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व उज्ज्वल करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जाहिरात

“GATE परीक्षा केवळ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून विज्ञान शाखेतील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीही करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देते,” असे प्रतिपादन आयआयटी मुंबई येथील रसायन अभियांत्रिकीतील संशोधक संथाकुमार व्ही. यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते. रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संथाकुमार व्ही. यांनी GATE परीक्षेतील चांगल्या गुणांच्या आधारे देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाबरोबरच विविध सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स तयार करणे, नियमित मॉक टेस्ट सोडवणे आणि तांत्रिक विषयांवर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

यावेळी आयआयटी मुंबई येथील रसायन अभियांत्रिकीतील संशोधक साईकत साहा यांनी मूलभूत विज्ञान विषयातील उच्च शिक्षणासाठी IIT-JAM (Joint Admission Test for M.Sc.) परीक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. आयआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये एम.एस्सी., संयुक्त एम.एस्सी.-पीएच.डी. तसेच इंटिग्रेटेड पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळविण्याची JAM ही सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य नियोजन, संकल्पना स्पष्ट असणे आणि नियमित सरावाच्या जोरावर ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करता येते, असेही त्यांनी नमूद केले.
साहा यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम, स्वरूप, गुणपद्धती आणि वेळेचे नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी IIT-JAM व GATE यांसारख्या स्पर्धात्मक व उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या पलीकडे संशोधन, उद्योग, उद्योजकता आणि नव्या ज्ञानक्षेत्रांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीच्या बळावर मोठी स्वप्ने साकार करावीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत व परिचय रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा. चंद्रभान चौधरी यांनी करून दिला. व्यासपीठावर कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. निलेश मालपुरे, डॉ. विलास गाडे व प्रा. अश्विनी पाटोळे उपस्थित होते. कार्यक्रमास विज्ञान शाखेतील प्राध्यापकांसह पदवी व पदव्युत्तर बी.एस्सी. आणि बी.सी.एस. वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा संवत्सरकर यांनी केले, तर आभार प्रा. ऋषिकेश सोनवणे यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे