आपला जिल्हा

संजीवनी युवा प्रतिष्ठानची दहीहंडी माणुसकीला प्राधान्य देत साध्या स्वरूपात;दहीहंडीचा भव्य खर्च टाळून बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

संजीवनी युवा प्रतिष्ठानची दहीहंडी माणुसकीला प्राधान्य देत साध्या स्वरूपात;दहीहंडीचा भव्य खर्च टाळून बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा
संजीवनी युवा प्रतिष्ठानची दहीहंडी माणुसकीला प्राधान्य देत साध्या स्वरूपात;दहीहंडीचा भव्य खर्च टाळून बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा
Kopargaon vijay kapse दि ६ सप्टेंबर २०२६कोपरगाव शहरात आ. विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी यंदा साध्या स्वरूपात साजरी करण्यात आली. मात्र देशातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थितीची जाणीव ठेवून उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळत त्यातील बक्षिसाची रक्कम आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा सामाजिक निर्णय घेण्यात आला. दहीहंडी रद्द न करता उत्सवाची परंपरा कायम ठेवत सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देण्यात आले.

जाहिरात
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मागील दोन वर्षांत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि धडाकेबाज पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदाही दहीहंडीची परंपरा कायम ठेवण्यात आली; मात्र देशातील विविध भागातील नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थितीची जाणीव ठेवून भव्य आयोजनावरील खर्च टाळून तो मदतकार्यासाठी वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे परंपरेला छेद न देता उत्सवातून माणुसकीचा संदेश देण्यात आला.

जाहिरात
कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गोपाळकाल्याच्या पावन पर्वानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी उत्सवातील बक्षिसाची रक्कम देशातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे चेकद्वारे सुपूर्द करण्यात आली. संकटाच्या काळात उत्सवाचा आनंद कायम ठेवत गरजूंच्या मदतीसाठी हात पुढे करण्याचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरला.

जाहिरात
कार्यक्रमादरम्यान इस्कॉनच्या भजनी मंडळाने भक्तिमय भजनांचे सादरीकरण केले. परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांनीही भजन सादर केल्याने कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते  यांच्यासह युवासेवक, प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक दहीहंडी उत्सवाची सांगड सामाजिक बांधिलकीशी घालत यंदाचा उत्सव साध्या स्वरूपात साजरा करण्यात आला.उत्सवाची परंपरा कायम ठेवत जल्लोषासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव जपण्याचा संजीवनी युवा प्रतिष्ठानचा निर्णय कोपरगावच्या सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारा ठरला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे