आपला जिल्हा

ब्राह्मण समाज महिला मंडळाचा अनोखा उपक्रम : रिक्षा चालकांना राखी बांधून जपले बंधुत्वाचे नाते

ब्राह्मण समाज महिला मंडळाचा अनोखा उपक्रम : रिक्षा चालकांना राखी बांधून जपले बंधुत्वाचे नाते

ब्राह्मण समाज महिला मंडळाचा अनोखा उपक्रम : रिक्षा चालकांना राखी बांधून जपले बंधुत्वाचे नाते

Kopargaon vijay kapse दि ६ सप्टेंबर २०२६शहरात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या वतीने एक हृदयस्पर्शी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात कोपरगाव तालुका रिक्षा -टॅक्सी संघटनेच्या सर्व रिक्षा चालकांना राखी बांधून जपले बंधुत्वाचे नाते.

जाहिरात

नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या रिक्षा चालक बांधवांना सन्मान देण्यासाठी कोपरगाव ब्राम्हण महिला मंडळाच्या सदस्यांनी शहरातील ऑटो रिक्षा – टॅक्सी संघटनेच्या सर्व सभासद रिक्षा चालकांच्या मनगटावर राखी बांधली. केवळ राखीच नाही तर त्यांना मिठाई भरवून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील केली.
यावेळी रिक्षा संघटनेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सालकर, मल्हारी देशमुख, प्रकाश शेळके, पापाभाई शेख, भरत शिनगारे,सुनील तांबट, सचिन नवले, शरीफ अत्तार, राजू रंगरेज, सुधाकर चव्हाण, रवींद्र वाघ, गोकुळ हंडोरे उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी महिला मंडळाच्या सदस्या माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई म्हणाल्या की,रिक्षा संघटनेचे संस्थापक राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सालकर हे तळमणीने समाजातील प्रत्येक घटकसाठी कामं करत आहे. यांच्यामुळे संघटना कुठेही मागे नाही. तुमचा व्यवसाय तुम्ही मोठ्या मान सन्मानाने करत आहे. समाजातील प्रत्येक घटंकांचे रक्षण करण्याचे कामं आपण करतात. रिक्षा चालक हे दररोज आपल्याला सुरक्षितपणे घरी पोहोचवतात. ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. रक्षाबंधन हा केवळ रक्ताच्या नात्याचा सण नसून, सामाजिक एकोपा आणि सुरक्षिततेची भावना जपणारा सण आहे. त्यामुळे आम्ही हा छोटासा प्रयत्न केला असल्याचे ही त्या शेवटी म्हणाले.

जाहिरात

राजेंद्र झावरे म्हणाले की,ब्राह्मण समाज महिला मंडळाने रिक्षा चालकांना राखी बांधण्याचा जो उपक्रम रबावाला हार्दिक खरंच खूप कौतुकास्पद आणि मनाला भिडणारा आहे. रिक्षा चालकाला कधी माणूस म्हणून, भाऊ म्हणून पाहतो का ? ब्राह्मण समाज महिला मंडळाने नेमकं तेच केलं.राखी ही फक्त सणाची दोरी नाही, ती एक विश्वासाची दोरी आहे. जेव्हा महिला मंडळाच्या भगिनींनी रिक्षा चालकांच्या हातावर राखी बांधली, तेव्हा त्यांना आम्ही एकच संदेश दिला “आम्ही तुमचे रक्षक आहोत अशी ग्वाही दिली.

जाहिरात

कैलास जाधव म्हणाले की, ब्राम्हण समाजाने आम्हाला रिक्षा वाल्याल्याना राखी बांधली त्यामुळे त्याचे मनापासून आभारी आहोत. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’च्या माध्यमातून सुरू झालेली निवृत्ती सन्मान योजना म्हणजे आमच्या कष्टाला मिळालेली केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या श्रमाला मिळालेला सन्मान आहे.या योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या रिक्षावाल्यांचे देव आहेत

राजेंद्र सालकर म्हणाले की,रिक्षाचालक हा केवळ प्रवासी वाहून नेणारा चालक नाही तर तो शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आमच्या रिक्षेत विद्यार्थी बसतो, महिला बसते, ज्येष्ठ नागरिक बसतो, रुग्ण बसतो, कष्टकरी कामगार बसतो. प्रत्येकाला सुरक्षितपणे त्याच्या ठिकाणी पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे.त्यामुळे ब्राम्हण समाज महिला मंडळाने आमची दाखल घेत राखी बांधून आम्हाला आज मिळालेला हा सन्मान आम्ही नवीन जबाबदारी म्हणून स्वीकारतो.

जाहिरात

ब्राम्हण समाज महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा,माजी नगरध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, अध्यक्षा विद्या गोखले, शिल्पा नेने, शैला लावर, मधुरा जोशी, ज्योती कोऱ्हाळकर, श्रद्धा जवाद, दीपाली जोशी, आरती महाजन, अंजली ठोंबरे, सोनाली गोरे, सुनैना केळकर, स्वाती मुळे, पूनम चिकटे, हर्षदा पटवर्धन, विशाला शालिग्राम आदींनी रिक्षा चालकांना राखी बांधून त्यांचा सन्मान केला.कार्यक्रमाचे आभार मल्हारी देशमुख यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे