आपला जिल्हा

शिर्डीत मंगळवार पासून रंगणार राष्ट्रीय गो चॅम्पियनशिपचा थरार

शिर्डीत  मंगळवार पासून रंगणार राष्ट्रीय गो चॅम्पियनशिपचा थरार

२० हून अधिक राज्यांतील ३०० हून अधिक अव्वल खेळाडूंचा सहभाग; ८ सप्टेंबरला भव्य उद्घाटन

Shirdi vijay kapse दि ६ सप्टेंबर २०२६ : इंडो अॅमॅच्युअर गो असोसिएशनच्या तत्वाधानाखाली व गो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने नॅशनल गो चॅम्पियनशिप २०२६चे आयोजन ८ ते १० सप्टेंबरदरम्यान साई संस्थान क्रीडा संकुल, शिर्डी येथे करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील २० हून अधिक राज्यांमधील ३०० पेक्षा अधिक टॉप रँकिंग खेळाडू सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा ८ सप्टेंबर रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गाडिलकर सर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, इंडो अॅमॅच्युअर गो असोसिएशनचे कार्यकारी सचिव चंदन पांडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. इंडियन फ्लोर बॉल असोसिएशनचे सचिव रविंद्र चौथवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, गो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अहमद लालानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याबाबत आयोजन सचिव अनिल सहारे यांनी सांगितले की, शिर्डीच्या पावन भूमीत राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा होत असून, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. तरुण पिढीला बौद्धिक खेळांकडे आकर्षित करणे हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय गो फेडरेशनच्या नियमानुसार ही स्पर्धा होणार असून विजेत्या खेळाडूंना पारितोषिक, ट्रॉफी, पदक तसेच राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळणार आहे. या निमित्ताने शिर्डीला देशभरातील अव्वल गो खेळाडूंच्या बौद्धिक कौशल्याचा थरार अनुभवता येणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे