आपला जिल्हा

पोहेगाव पतसंस्थेने पारदर्शक व्यवहारातून विश्वास जपला : नितीनराव औताडे

पोहेगाव पतसंस्थेने पारदर्शक व्यवहारातून विश्वास जपला : नितीनराव औताडे

संस्थेच्या ठेवी २२९ कोटींवर; २ कोटी ६४ लाखांचा नफा — सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर

Kopargaon vijay kapse दि १८ सप्टेंबर २०२६ : ३७ वर्षांपूर्वी अत्यंत मर्यादित साधनसामग्रीच्या माध्यमातून सुरू झालेल्या पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेने सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करत भक्कम आर्थिक वाटचाल केली आहे. ठेवीदारांनी संस्थेकडे ठेवलेला पैसा हा त्यांच्या कष्टाचा असल्याने त्याचे संरक्षण करणे ही संस्थेची जबाबदारी आहे. त्यामुळे वसुली करताना प्रसंगी कटुता आली तरी जनतेच्या हितासाठी ती स्वीकारण्याची तयारी ठेवून पारदर्शक कारभार केला. त्यामुळे ठेवीदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही आणि यापुढेही देणार नाही, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.

जाहिरात

पोहेगाव येथे पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना नितीनराव औताडे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे होते.

नितीनराव औताडे म्हणाले, ग्रामीण भागातून सुरू झालेली ही संस्था आज शहराकडे झेप घेत असून, विश्वासार्ह आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर संस्थेने आर्थिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेने २२९ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून, आगामी काळात ठेवी ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

संस्थेच्या थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ते म्हणाले की, कर्जवाटपाइतकीच कर्जाची वेळेत परतफेड होणे महत्त्वाचे आहे. थकीत कर्जदारांकडून वसुली करताना प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतात. संस्थेची आर्थिक शिस्त आणि सभासदांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी वसुली प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

संस्थेचा कारभार सध्या नाशिक व पुणे विभागातील दहा जिल्ह्यांमध्ये विस्तारला असून, संस्थेला महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मिळावे, यासाठी सभेत ठराव संमत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

जाहिरात

यावेळी अध्यक्ष दादासाहेब औताडे यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सादर केला. संस्थेला २ कोटी ६४ लाख रुपयांचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांचा सहभाग आणि संस्थेवरील विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सभेच्या प्रारंभी आप्पासाहेब कोल्हे यांनी प्रास्ताविक व विषयपत्रिकेचे वाचन केले. सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केले, तर असिस्टंट जनरल मॅनेजर विठ्ठल घारे यांनी आभार मानले.

नितीनराव औताडे

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास रत्ने, कोपरगाव बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, संचालक रमेश झांबरे, ॲड. शिवाजी खामकर, उपसरपंच अमोल औताडे, ऋत्विक औताडे, रवींद्र औताडे, प्रकाश औताडे, प्रशांत रोहमारे, भाऊसाहेब वाघ, प्रमोद भालेराव, रामचंद्र ठोंबरे, अर्जुन पवार, सूर्यभान औताडे, अरुण डोखे, सोमनाथ सोनवणे, बाळासाहेब औताडे, चांगदेव वाके, प्रतापराव गायकवाड, व्यवस्थापक सुभाष औताडे, विठ्ठल घारे, आप्पासाहेब कोल्हे, श्री. मोजड यांच्यासह सर्व संचालक, सभासद, कर्मचारी व कलेक्शन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे