जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाची चर्चा; मुख्यमंत्री ज्याला योग्य समजतील, तोच चेअरमन होईल;माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची स्पष्ट भूमिका

Ahilyanagar vijay kapse दि २६ सप्टेंबर २०२६ : जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू असल्याचे माझ्याही कानावर येत आहे. मात्र, माझ्या विरोधात कोण आहे, मला कोणाचा त्रास आहे किंवा माझा कोणाला त्रास आहे, याची मला कल्पना नाही, असे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे यासाठी मी कुठेही धावत नाही. मी कधीही जिल्हा बँकेचा चेअरमन होणार असल्याचे म्हटलेले नाही. माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय ज्याला योग्य समजतील, तोच व्यक्ती जिल्हा बँकेचा चेअरमन होईल, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
सध्या जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी माझा कोणताही संघर्ष किंवा प्रयत्न सुरू नाही. माझे प्रयत्न वेगळ्या दिशेने सुरू आहेत. जागतिक स्तरावर, विशेषतः वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांमध्ये काम करण्याची काही संधी मिळू शकते का, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काही काम करण्याची संधी मिळते का, हे आपण पाहत आहोत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. हीच माझी कालची भूमिका होती आणि आजही तीच भूमिका आहे, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.