आपला जिल्हा

विद्युत पुरवठ्याच्या समस्येला दिलासा, बालाजीनगरमध्ये १०० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

विद्युत पुरवठ्याच्या समस्येला दिलासा, बालाजीनगरमध्ये १०० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित
नगरसेवक प्रशांत कडू यांच्या मागणीची दखल घेत आ. विवेक कोल्हे यांच्याकडून प्रश्न मार्गी
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १९ सप्टेंबर २०२६–कोपरगाव शहरातील बालाजीनगर, साईनगर आणि लक्ष्मीनगरचा काही भाग आदीसह परिसरातील नागरिकांना अपुऱ्या क्षमतेच्या विद्युत पुरवठ्यामुळे गेल्या काही काळापासून अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पाणीपुरवठा झाल्यानंतर मोटारी सुरू करताना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच वारंवार विद्युत दाब कमी-जास्त होत असल्याने घरगुती विद्युत उपकरणांनाही धोका निर्माण होत होता.

जाहिरात
नागरिकांच्या या समस्येची नगरसेवक प्रशांत कडू यांनी गांभीर्याने दखल घेत आ. विवेक कोल्हे यांच्याकडे करण्यात आलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, साईनगर भागातील बालाजीनगर येथे 100 केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम आज पूर्ण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठ्याची क्षमता वाढण्यास मदत होणार असून, कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर होण्याची अपेक्षा आहे.

जाहिरात
आ. विवेक कोल्हे यांच्या सूचनेनुसार तसेच नगराध्यक्ष पराग संधान यांच्या सहकार्याने नगरसेवक प्रशांत कडू यांच्या प्रयत्नातून बालाजीनगर येथील जुना ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. नागरिकांची दैनंदिन गैरसोय लक्षात घेऊन हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात आला. दरम्यान, नवीन 100 केव्ही ट्रान्सफॉर्मरवर परिसराचा विद्युत भार योग्य पद्धतीने व्यवस्थापित न झाल्यास 200 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या सूचना आमदार विवेक कोल्हे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे विद्युत भाराचा नियमित आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत आणि पुरेशा क्षमतेने उपलब्ध झाल्यास पाणीपुरवठ्याच्या वेळेस मोटार सुरू करण्यापासून घरगुती उपकरणांच्या सुरक्षित वापरापर्यंत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे