जिल्हा शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी जाधव यांची निवड
जिल्हा शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी जाधव यांची निवड
जिल्हा शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी जाधव यांची निवड

कोपरगाव विजय कापसे दि ३ मे २०२५ – कोपरगाव तालुक्यातील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री चांगदेव बारकू पाटील कोळपे माध्यमिक विद्यालय सुरेगाव येथील शिक्षक सचिन जाधव यांची नुकतीच अहिल्यानगर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या तज्ञ संचालकपदी निवड झाल्याने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या निवडी प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे , व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके, तसेच स्वाभिमानी परिवर्तन पॅनलच्या विजयाचे प्रमुख शिलेदार राजेंद्र लांडे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनिल पंडित, संचालक बाबासाहेब बोडके, संचालक महेंद्र हिंगे, संचालक अतुल कोताडे यांच्या सह सर्व संचालक मंडळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन जाधव यांची जिल्हा बँकेच्या तज्ञ संचालकपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल जाधव यांनी बोलताना सांगितले की, सभासदांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत त्यांच्या हिताचे प्रश्न सक्षमपणे मांडणार आसल्याचे सांगितले.




