येवला येथील आत्मा मालिक गुरुकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
येवला येथील आत्मा मालिक गुरुकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
येवला येथील आत्मा मालिक गुरुकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

येवला विजय कापसे दि ३ मे २०२५– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल येवला येथे अध्यक्ष हनुमंत भोंगळे व उपाध्यक्ष हेमंत शाह यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.यावेळी हेमंत शाह, प्राचार्य तुषार कापसे,व संत चरणदास महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले आणि राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली घोडके यांनी केले व कामगार दिन व महाराष्ट्र दिन याविषयी मोनाली सोनवणे यांनी माहिती सांगितली. त्यात त्यांनी कामगारांच्या लढ्याबद्दल व त्यांच्या हक्काबद्दल सांगितले. कामगारांनी आपल्या हक्कासाठी हा लढा सुरू केला होता व त्यात ते यशस्वी झाले म्हणून 1मे हा दिवस त्यांच्या हक्काचा दिवस मानला जातो. सुमारे 80 हून जास्त देशांमध्ये 1मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच आपण महाराष्ट्रीयन आहोत तर महाराष्ट्राचा अभिमान ठेवत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

गुरुकुलाचे उपाध्यक्ष हेमंत शाह यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तुषार कापसे यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री खानापुरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.त्यानंतर इयत्ता पहिली ते नववी चा निकाल जाहीर करण्यात आला. सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.





