आ. सत्यजित तांबे यांच्या निधीतून झालेल्या सभामंडपाचे लोकार्पण

महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे–माजी मंत्री बाळासाहेब थोरातमाजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांची नवरात्रीनिमित्त देवीला प्रार्थना

Sangmner vijay kapse दि १६ ऑक्टोबर २०२६–नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी तुळजाई माता मंदिराच्या सभा मंडपासाठी 20 लाख रुपयांचा निधी दिला असून जोरवे येथील प्रतीत उद्योजक के.के थोरात यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ वीस लाख रुपयांचा निधी देऊन एकत्रितपणे उभारलेल्या भव्य सभा मंडपाचे लोकार्पण राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थित करण्यात आले असून तालुका विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गावातील विकास कामांसाठी सातत्याने निधी दिला आहे . यावर्षी दुष्काळाचे मोठे सावट निर्माण झाले असून नवरात्रीच्या निमित्ताने जगदंबा मातेने राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करावे अशी प्रार्थना राज्याचे माजी कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

कोकणगाव येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुळजाई माता परिसर सुशोभीकरण व सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे, युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन के.के थोरात, शरद नाना थोरात, सरपंच आशाताई जोंधळे, अण्णासाहेब थोरात , सुरेशराव थोरात, पोपटराव थोरात, विनायक जोंधळे, कचेश्वर जोंधळे, विठ्ठल पानसरे ,दिलीप जोंधळे, बाबासाहेब शिंदे, आबाजी शिंदे, रामभाऊ कडलक, नानासाहेब वायकर, हनुमंता जोंधळे, भागवत महाराज, विकास जोंधळे, नवनाथ थोरात ,वेदांत शिंदे ,शिवाजी जोंधळे, शामराव जोंधळे, नारायण काशिनाथ थोरात सतीश थोरात राजेंद्र थोरात बाळासाहेब थोरात आबासाहेब शिंदे नानासाहेब शिंदे पोपट थोरात यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जोर्वे येथील उद्योजक व सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन केके थोरात यांनी स्वर्गीय सीताबाई गणपत थोरात, स्वर्गीय सावित्रीबाई केशव थोरात आणि स्वर्गीय हरणाबाई रंगनाथ थोरात यांच्या पुण्यस्मरणार्थ परिसर सुशोभीकरणासाठी मोठी मदत केली याचबरोबर आमदार सत्यजित तांबे यांनी तुळजाई माता मंदिर परिसर व सभा मंडपासाठी 20 लाख रुपयांचा निधी दिला होता या माध्यमातून झालेल्या विकास कामांचे लोकार्पण नवरात्रीच्या निमित्ताने करण्यात आले. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की संगमनेर तालुका विस्ताराने मोठा आहे तालुक्यात सातत्याने मोठमोठी विकास कामे मार्गी लागली आहेत याचबरोबर प्रत्येक गावातील विकास कामांसाठी आपण निधी दिला आहे. ग्रामीण विकास सहकार शिक्षण आणि सततचे काम यामुळे तालुका वैभवशाली ठरला आहे. कोकणगाव मधील निजरणेश्वर मंदिर परिसरासाठी आपण निधी दिला असून हे मोठे पर्यटन व धार्मिक स्थळ ठरले आहे याप्रमाणे तुळजाई माता मंदिर परिसर सुद्धा तसाच ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करताना नागरिकांनी सातत्याने या परिसराची काळजी घ्यावी असे ते म्हणाले.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याची ओळख राज्यात विकसित तालुका म्हणून ठरली आहे. गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. प्रत्येक धार्मिक स्थळांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निधी दिला आहे. तालुक्यामध्ये महादेवाची अनेक मंदिर आहे त्याचप्रमाणे जगदंबा मातेच्या मंदिरांसाठीही निधी दिला आहे. मंदिरेही मनशांतीचे मोठे केंद्र असल्याचे ते म्हणाले.
डॉ जयश्री थोरात म्हणाल्या की साधुसंत महंत आणि समाज सुधारक यांनी मानवतेचा आणि समानतेचा मंत्र दिला आहे मानवता हा धर्म मोठा असून तो पुढे नेण्यासाठी आपण एकत्रित काम करूया.
तर के.के थोरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून आपण परंपरा जपली आहे.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व सर्व मान्यवरांनी देवीचे दर्शन घेऊन राज्यावरील दुष्काळ सावट दूर व्हावी अशी प्रार्थना केली.



