अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानामधून विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी – शरयू देशमुख

अमृतवाहिनीतील फूड एक्सपो मधून खाद्यपदार्थांची मेजवानी

अमृतवाहिनीतील वसंतदादा क्रीडा संकुल येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय व अमृतवाहिनी फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित फूड एक्सपो 2026 च्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. व्हि.बी.धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघ, डॉ बी एम लोंढे, प्रा. जी.बी बाचकर, प्रा डॉ बी ए जाधव, शिवाजी जगताप, पालक प्रतिनिधी दिलीप कानकाडे, नामदेव गायकवाड, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अमृतवाहिनीच्या क्रीडा संकुलात फूड एक्सपो मध्ये संगमनेर शहर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील फूड प्रोसेसिंग असलेल्या 70 उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये खाद्यपदार्थ, फराळाचे पदार्थ, यांचे भव्य स्टॉल असून अमृतवाहिनीतील या फूड स्टॉलमुळे खवय्यांना मोठी मेजवानी मिळाली आहे.
याप्रसंगी बोलताना शरयू देशमुख म्हणाल्या की, राज्याचे माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कृषी महाविद्यालय व फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील मोठ्या संधी निर्माण करून दिल्या आहेत. अमृतवाहिनी हे शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचे मोठे नाव आहे. या दोन महाविद्यालयांमधून सुद्धा गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी संस्था पूर्ण प्रयत्न करत आहे.

यावर्षी शेती संकटात आहे. शेतकरी दिवसभर शेतात राबतो आणि त्यातून मिळणाऱ्या पिकांमधून आपण अन्न खातो. म्हणून प्रत्येक घास खाताना शेतकऱ्याची आठवण करा. आपण चांगले अन्न खात असताना अनेक जण उपाशी आहे. याची काळजी करा .कुठेही अन्नाची नासाडी करू नका असा सल्ला त्यांनी दिला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्तेचे व शुद्ध खाद्यपदार्थ अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आगामी काळात फूड टेक्नॉलॉजी, केटरिंग या क्षेत्रांमधून विद्यार्थी व युवकांना करिअरच्या शाश्वत संधी निर्माण झाल्या असल्याचे त्या म्हणाल्या. तर प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या दोन्ही महाविद्यालयांमधून गुणवत्तेमुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण व प्रात्यक्षिक मिळावे याकरता महाविद्यालयातून पूर्ण प्रयत्न केले जात आहे.
जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला लक्षात ठेवा असे सांगताना सार्वजनिक कार्यक्रमांमधून अनेक ठिकाणी अन्नाची नासाडी होत असून ही अन्नाची नासाडी टाळण्याकरता कृषी व अन्न प्रक्रिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजामध्ये अधिक जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्र वाघ यांनी केले, सूत्रसंचालन प्रा श्वेता कडू व प्रा स्वाती महाजन यांनी केले. तर प्रा.जी.बी बाचकर यांनी आभार मानले. दोन दिवस असलेल्या फूड एक्स्पो मध्ये विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला.



