अहिवाले आम्रपाली मकरंद यांना मानव संसाधन व्यवस्थापन विषयात पीएच.डी. पदवी

अहिवाले आम्रपाली मकरंद यांना मानव संसाधन व्यवस्थापन विषयात पीएच.डी. पदवी


या संशोधनातून आयटी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि मानव संसाधन व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांचा सहभाग यासंदर्भात महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्यांच्या पीएच.डी. पदवीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या उल्लेखनीय यशाबद्दल माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख, अनिल शिंदे, व्यवस्थापन समितीचे सदस्य, अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. बाबा लोंढे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आम्रपाली अहिवाले व त्यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. नितीन भांड यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य
अमृतवाहिनी संस्था शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देणारी संस्था म्हणून अमृतवाहिनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची आणि गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेत संस्थेला वेळोवेळी विविध पुरस्कार व मानांकने प्राप्त झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करून त्यांना यशाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचे आम्रपाली अहिवाले यांच्यासारख्या विद्यार्थ्यांचे यश हे एक उदाहरण आहे.



