आपला जिल्हा

नवरात्रीनिमित्त येडेश्वरी मातेची महाआरती काळे कुटुंबियांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न.

नवरात्रीनिमित्त येडेश्वरी मातेची महाआरती काळे कुटुंबियांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न.

नवरात्रीनिमित्त येडेश्वरी मातेची महाआरती काळे कुटुंबियांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न.

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १८ ऑक्टोबर २०२६ : – भाविकभक्तांच्या मनोकामना पूर्णत्वास नेण्याकरिता माँ जगदंबाने “अनंत रुपे अनंत वेश ” धारण करून श्रध्दावती भाविक भक्तांना संसारुपी भव सागरातून तरुण जाण्यास सुखकर भक्तीमार्ग प्रदान केला आहे. असेच एक संवत्सर गावातील बिरोबाचौक येथील श्री येडेश्वरी मातेचे छोटेशे मंदिर आहे. याठिकाणी भाविकांच्या हस्ते दररोज नित्यनेमाने श्रध्देने पुजाअर्चा केली जाते.नवरात्र उत्सवानिमित्त सातव्या माळेची सायंकाळची महाआरती भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष व श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे व सौ. छायाताई मुकुंदमामा काळे या उभय दांपत्यांच्या शुभहस्ते देवीला पुषहार अर्पण करून मोठ्या भक्तिभावाने संपन्न करण्यात आली. व देवीचे सेवेकरी विठ्ठल महाराज पवार यांचे आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

जाहिरात

या प्रसंगी संजीवनी सहकारी पतसंस्था, कोपरगावचे चेअरमन राजेंद्र परजणे , सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना मा. संचालक बाळासाहेब शेटे, भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळाचे सचिव संदीप मैंद, संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, दिनेश बोरनारे, राजेंद्र बोरनारे, दिलीपराव कासार, चिमाजी दैने, अनिल भाकरे, मोहन निकम, संदीप पवार, तानाजी मैंद, कैलास बोरसे, कुणाल आहेर, मंगेश पवार, आदित्य पवार, गणेश गोरे, अन्वर सैय्यद, राहुल गायकवाड, दीपक सोनवाने, प्रवीण जाधव, प्रवीण गोरे, सचिन गायकवाड, वसंत दाभाडे, एकनाथ मैंद, राजेंद्र मैंद, बाबासाहेब कासार, पंढरीनाथ नेहे, अजय पवार, लहानू गायकवाड, विशाल सोनवाने, रामदास गायकवाड, दत्तात्रेय पवार, मीना विठ्ठल पवार, हिराबाई गायकवाड, शांताबाई मैंद, अलका बोरसे, पूजा संदीप पवार, रूपा कैलास बोरसे, ललिता गायकवाड आदी भक्तगण उपस्थित होते.

जाहिरात

काळे कुटुंबियांनी श्री येडेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना केली कि, आई येडेश्वरी माते तुझा आशिर्वाद सर्व भक्तांवर सदैव राहु दे. या दुष्काळाचा सामना करण्याची सर्वांना शक्ती दे. भाविकांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, हीच मनोभावे प्रार्थना!

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे