आपला जिल्हा

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी कोल्हे कारखाना कार्यस्थळावर शाळा सुरू करण्याची तयारी

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी कोल्हे कारखाना कार्यस्थळावर शाळा सुरू करण्याची तयारी

गटशिक्षणाधिकारी पी. एस. वाजे यांनी केली जागेची पाहणी; स्थलांतरित विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी प्रशासनाला सूचना

Kopargaon vijay kapse दि २६ ऑक्टोबर २०२६ : ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या कार्यस्थळांवर मोठ्या संख्येने स्थलांतरित ऊसतोडणी कामगार दाखल झाले आहेत. या कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवता यावे, यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरच शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी करण्यात आली.

जाहिरात

कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती पी. एस. वाजे यांनी सोमवारी कोल्हे कारखाना कार्यस्थळास भेट देऊन ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या शिक्षणासाठी थळावर शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने उपलब्ध जागेची पाहणी करून प्रशासन व कारखाना यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या.

जाहिरात

यावेळी प्रारंभी शेतकी अधिकारी नारायण चौधरी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे तसेच कारखान्याचे युवा अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे हे थळावर दाखल होणाऱ्या ऊसतोडणी कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने सहकार्य करतात. स्थलांतरित ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांच्या प्राथमिक शिक्षणात खंड पडू नये, यासाठी थळावरच शालेय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येतात.

जाहिरात

गटशिक्षणाधिकारी पी. एस. वाजे यांनी कारखाना कार्यस्थळावर दाखल झालेल्या ऊसतोडणी कामगारांच्या लहान मुलांची संख्या व शैक्षणिक माहिती जाणून घेतली. या मुलांसाठी थळावरच शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी केली. तसेच शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन, विद्यार्थ्यांची नोंदणी आणि शैक्षणिक सुविधा याबाबत प्रशासन व कारखाना यंत्रणेला मार्गदर्शन केले.

यापूर्वी गटशिक्षणाधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंगणापूर येथे भेट देऊन शिक्षकांची बैठक घेतली. स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी शासनस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती शिक्षकांना देण्यात आली. तसेच ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी थळावर शाळा कोणत्या पद्धतीने सुरू करावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी केंद्रप्रमुख रावसाहेब लांडे, लक्ष्मण पंडोरे, शरद आहेर, अशिष पारडे, वर्षा आगळे, अजित मुनतोंडे, राजेंद्र पाखरे, कांतीलाल गुरसळ, अमित रणधिर, सचिन म्हस्के, विवेक सोनवणे, सुवर्णा मगर आदी उपस्थित होते. शेवटी उपशेतकी अधिकारी चंद्रकांत वल्टे यांनी आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे