काळे कारखाना कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड कर्मचाऱ्यांना एकरक्कमी २० टक्के बोनस देण्याचा आ.आशुतोष काळेंचा निर्णय
काळे कारखाना कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड कर्मचाऱ्यांना एकरक्कमी २० टक्के बोनस देण्याचा आ.आशुतोष काळेंचा निर्णय
काळे कारखाना कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड कर्मचाऱ्यांना एकरक्कमी २० टक्के बोनस देण्याचा आ.आशुतोष काळेंचा निर्णय

Kopargaon vijay kapse दि २६ ऑक्टोबर २०२६ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना याहीवर्षी कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना एकरक्कमी २० टक्के बोनस देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी जाहीर करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांचे हित जोपासतांना दरवर्षी कर्मचाऱ्यांना भरघोस दिवाळी बोनस देवून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.ही परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू असून यावर्षी देखील कामगारांना एकरक्कमी २० टक्के बोनस देण्याचा निर्णय आ.आशुतोष काळे यांनी घेतला आहे.ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसची जवळपास साडेपाच कोटी रुपये रक्कम बाजारात येणार आहे.त्यामुळे निश्चितपणे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल वाढणार असून व्यापाऱ्यांचा देखील मोठा आर्थिक फायदा होणार असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्याप्रमाणेच माजी आमदार अशोकराव काळे यांनीही नेहमीच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवली असून, त्यांची हीच परंपरा कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे पुढे चालवत असून कारखान्याचे प्रमुख घटक असलेले ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांच्या हिताला त्यांनी सदैव प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार करण्यात आलेल्या कारखाना कर्मचाऱ्यांच्या १० टक्के पगारवाढीच्या एकूण रक्कमेची अंमलबजावणी करतांना ५० टक्के फरकाची रक्कम ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांना कारखान्याकडून अदा करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे २०२५-२६ च्या हंगामातील ऊसाला यापूर्वी पहिली उचल प्र.मे.टन रुपये ३०००/- दिल्यानंतर जून महिन्यात प्र.मे.टन रुपये १००/-ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यामध्ये वाढ करून कार्यक्षेत्रातील ऊसाला रु.१५०/- व प्रोत्साहनपर अनुदान रु.५०/- असे एकुण २००/- प्र.मे.टन तसेच कार्यक्षेत्राबाहेर रु.१५०/- प्रमाणे ऊस बिलाची रक्कम दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व ऊस उत्पादकांचे बँक खात्यात जमा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची पण दिवाळी गोड व्हावी यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना एकरक्कमी २० टक्के बोनस देणार असल्याचे जाहीर करून दिवाळीपूर्वी हि रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून कर्मचाऱ्यांच्या वतीने युनियनचे जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ व सेक्रेटरी प्रकाश आवारे यांनी आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे, डिस्टीलरीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ, चीफ अकौंटंट वैभव काळे आदी होते.




