आपला जिल्हा

पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केविलवाणा; राजकीय शिष्टाचार जपलेच पाहिजेत – बाळासाहेब थोरात

पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केविलवाणा; राजकीय शिष्टाचार जपलेच पाहिजेत – बाळासाहेब थोरात

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या प्रकाराचा निषेध; विरोधकांना वैचारिक चर्चेचे आव्हान

Sangmner vijay kapse दि १८ नोव्हेंबर २०२६ : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत  काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संबंधितांवर जोरदार टीका केली. लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र ते व्यक्त करताना सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार जपणे आवश्यक आहे. पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे हा केविलवाणा प्रकार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट असून झालेल्या प्रकाराबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे.

जाहिरात

या प्रकरणावर भूमिका मांडताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाहीमध्ये कोणत्याही पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात. त्या विचारांवर टीका करण्याचा, असहमती व्यक्त करण्याचा आणि आपली भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित पुस्तक वाचणे, त्यातील विचार समजून घेणे आणि त्यावर वैचारिक व बौद्धिक चर्चा करणे अपेक्षित आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुस्तकाच्या प्रती फाडण्यासारखे कृत्य करणे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे.

जाहिरात

या निषेध आंदोलनात व कृत्यात आघाडीवर असलेल्या नेत्यांच्या राजकीय भूमिकेवरही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, या कृतीत पुढे असलेले बहुतांश लोक सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आणि स्वार्थासाठी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत. त्यांना स्वतःचा असा कोणताही ठोस राजकीय इतिहास किंवा भूगोल नाही. अशा लोकांनी सोनियाजींच्या त्यागावर आणि जीवनप्रवासावर भाष्य करणे हास्यास्पद आहे. सार्वजनिक जीवनात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे; मात्र किमान सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार जपला गेला पाहिजे.

जाहिरात

श्रीमती सोनिया गांधी यांच्या राजकीय व वैयक्तिक जीवनप्रवासाचा संदर्भ देताना थोरात म्हणाले, आम्ही सोनियाजींचा त्याग, त्यांचा खडतर संघर्ष आणि देशाप्रती असलेले अफाट समर्पण अत्यंत जवळून पाहिले आहे. त्यांनी सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान आणि प्रतिकूल परिस्थितीत केलेला संघर्ष हा प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनप्रवासातील अनुभव आणि विचार त्यांनी स्वतःच्या शब्दांत या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडले आहेत. त्यामुळे या पुस्तकाबाबत आक्षेप असतील, तर ते पुस्तक वाचून त्यातील मुद्द्यांवर चर्चा करावी. केवळ पुस्तकाच्या प्रती फाडून विरोध व्यक्त करणे योग्य नाही.

पुस्तक फाडण्याच्या प्रकारामुळे पुस्तकाबद्दल रोष निर्माण होईल, असे विरोधकांना वाटत असेल; मात्र प्रत्यक्षात या प्रकारामुळे वाचकांची उत्सुकता अधिक वाढणार आहे. पुस्तकात नेमके काय आहे, सोनिया गांधी यांचा जीवनप्रवास कसा आहे आणि त्यांनी कोणते अनुभव मांडले आहेत, हे जाणून घेण्यासाठी अधिकाधिक लोक पुस्तक वाचतील. या घटनेमुळे पुस्तकाची चर्चा व्यापक होईल आणि मोठ्या संख्येने वाचक पुस्तकाकडे वळतील, असा ठाम विश्वासही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

जाहिरात
लोकशाहीत विचारांना विचारांनी उत्तर देण्याची परंपरा महत्त्वाची असते. राजकीय मतभेद असले तरी त्यातून वैयक्तिक द्वेष किंवा असंस्कृत वर्तन व्यक्त होऊ नये. राजकारणात सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका माजी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या निमित्ताने मांडली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे