श्रीमती सोनिया गांधींच्या पुस्तकातून उलगडले भावविश्व : लोकनेते बाळासाहेब थोरात

राजकीय विचार कोणतेही असो सोनियाजींच्या व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी बाजू समजून घेण्यासाठी प्रत्येकाने पुस्तक वाचावे

श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या पुस्तकाबाबत बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, हे पुस्तक हातात आल्यानंतर ते खाली ठेवावेसे वाटत नसल्याचा अनुभव त्यांनी आवर्जून सांगितला असून, सोनिया गांधींचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या स्वतःच्या शब्दांतून समजून घेण्याची ही एक अत्यंत सुंदर संधी आहे.

श्रीमती सोनिया गांधी यांनी आपल्या आयुष्यातील विविध प्रसंग प्रामाणिकपणे व मनमोकळेपणाने या पुस्तकात मांडले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्तकडे पाहण्याचा एक नवीन आणि वेगळा दृष्टिकोन मिळतो, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले. भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावरील त्यांचे प्रेम, त्या नात्यातील उत्कटता, भावनिक गुंतवणूक व त्यातून त्यांच्या मनात निर्माण झालेली घालमेल या साऱ्या गोष्टी पुस्तकातून प्रभावीपणे उलगडत जातात.
देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नवा विचार देणारे राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर भारतात येण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. गांधी कुटुंबाची सून म्हणून नव्या आयुष्याला सुरुवात करताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. वेगळे सामाजिक वातावरण, वेगळी संस्कृती आणि परंपरा यांच्याशी जुळवून घेताना त्यांना ज्या संघर्षातून जावे लागले, त्याचा प्रवास या पुस्तकातून समोर येतो. भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धतीशी सोनिया गांधी ज्या सहजतेने एकरूप झाल्या, त्याविषयी आजवर अनेकांनी ऐकले आहे.

मात्र, हे सर्व अनुभव घेत असताना त्यांच्या मनात नेमके काय विचार सुरू होते आणि त्यांनी परिस्थितीशी कसा समन्वय साधला, हे त्यांच्याच शब्दांत वाचणे हा एक वेगळाच अनुभव असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
हे पुस्तक केवळ एका राजकीय व्यक्तिमत्त्वाचे आत्मकथन नसून प्रेम, नातेसंबंध, त्याग, संघर्ष आणि नव्या संस्कृतीचा स्वीकार अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा एक प्रेरणादायी जीवनप्रवास ठरतो. आपले राजकीय विचार कोणतेही असोत, सोनिया गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची ही प्रेरणादायी बाजू समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचायला हवे, असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. याचबरोबर पुस्तक पूर्ण वाचून झाल्यानंतर याबाबत सविस्तर लिहीन असेही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
सोनियाजींच्या जीवनकार्याची प्रेरणादायी माहिती – डॉ. थोरातश्रीमती सोनिया गांधी यांनी त्यांच्या बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव या पुस्तकांमधून त्यांचा जीवन प्रवास मांडला आहे अत्यंत प्रामाणिकपणे आणि मन मोकळेपणाने या पुस्तकात त्यांनी पूर्ण मांडणी केली असून त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये त्यांच्या मनामध्ये झालेली घालमेल त्यांनी व्यक्त केलेली आहे हे पुस्तक नक्कीच तरुण पिढीसाठी आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे असल्याचे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.



