वाकडी, रामपुरवाडी, चितळी व धनगरवाडीचे बंधारे आणि पाणीपुरवठा योजनेचे तलाव तातडीने भरावेत
निळवंडे डाव्या कालव्याच्या आवर्तनातून पाणी देण्याची आ. विवेक कोल्हे यांची कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी
Rahata vijay kapse दि १९ नोव्हेंबर २०२६-राहाता तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील वाकडी, रामपुरवाडी, चितळी आणि धनगरवाडी या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनातून गावांतील सर्व पाणी साठवण बंधारे तसेच पाणीपुरवठा योजनेचे तलाव तातडीने भरून द्यावेत, अशी मागणी आ. विवेक कोल्हे यांनी केली आहे.जाहिरात
यासंदर्भात आ. विवेक कोल्हे यांनी उर्ध्व प्रवरा प्रकल्प विभाग (निळवंडे-२), घुलेवाडी, ता. संगमनेर येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की,कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी, रामपुरवाडी, चितळी व धनगरवाडी परिसरात यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे संबंधित गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी, तर शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाण्याची मोठी अडचण भेडसावत आहे.जाहिरात
या पार्श्वभूमीवर संबंधित गावांतील ग्रामपंचायतींचे सरपंच आणि नागरिकांनी पाणी साठवण बंधारे व पाणीपुरवठा योजनेचे तलाव कालव्याच्या आवर्तनातून भरून देण्याची मागणी आ. कोल्हे यांच्याकडे केली होती.या मागणीची दखल घेत आ.विवेक कोल्हे यांनी निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासह त्यावरील शाखा कालव्याच्या सुरू असलेल्या आवर्तनातून वाकडी, रामपुरवाडी, चितळी आणि धनगरवाडी येथील सर्व पाणी साठवण बंधारे व पाणीपुरवठा योजनेचे तलाव तातडीने भरून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.जाहिरात
चारही गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून दिलासा मिळावा आणि उपलब्ध पाणीसाठ्यामुळे शेतीच्या गरजाही भागविण्यास मदत व्हावी, यासाठी पाटबंधारे विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी आ. विवेक कोल्हे यांनी केली आहे.