आपला जिल्हा

दुग्धव्यवसायात यशासाठी पशुपालकांनी पंचसूत्राचा अवलंब करावा-डॉ.नितीन मार्कंडेय

दुग्धव्यवसायात यशासाठी पशुपालकांनी पंचसूत्राचा अवलंब करावा-डॉ.नितीन मार्कंडेय

कर्मवीर कृषी महोत्सवात दूध उत्पादकांना प्रजनन व आरोग्य व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

Kopargaon vijay kapse दि २३ नोव्हेंबर २०२६:- दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर आणि समृद्ध करण्यासाठी पशुपालकांनी पारंपरिक पद्धतीला विज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. जनावरांचे वजन, संतुलित खाद्य, चारा लागवडीचे नियोजन, गुणवत्तापूर्ण सिमेनची निवड व रक्त तपासणी या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास जनावरांचे आरोग्य सुधारून वेळेवर प्रजनन आणि दूध उत्पादनात वाढ साधता येईल, असे प्रतिपादन परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय यांनी केले.

जाहिरात

माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूल मैदानावर आयोजित कर्मवीर कृषी महोत्सव २०२६ च्या शेवटच्या दिवशी सोमवार (दि.२३) रोजी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘दुधाळ जनावरांचे प्रजनन व आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.मार्कंडेय बोलत होते.

जाहिरात

दुग्धव्यवसायात वाढती उष्णता, थंडी, चारा टंचाई आणि उत्पादन खर्च यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत असले, तरी शास्त्रीय पद्धतीने नियोजन केल्यास हा व्यवसाय शेतीला आर्थिक बळ देणारा ठरू शकतो.जनावरांना केवळ हिरवा व सुका चारा देण्यावर अवलंबून न राहता त्यांच्या वजनानुसार खाद्याचे प्रमाण, पोषणमूल्ये, चारा लागवड आणि आरोग्यविषयक बाबींचे नियोजन करणे गरजेचे आहे. संतुलित आहारामुळे जनावरांची शारीरिक स्थिती सुधारते आणि दूध उत्पादन क्षमताही वाढते.जनावरांचे वजन आणि पोषण यांचा प्रजनन क्षमतेशी थेट संबंध असून कमी वजनामुळे माजावर न येणे, गर्भधारणेस विलंब होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जनावरांचे वजन नियमित तपासणे, योग्य खाद्य देणे आणि माजाची लक्षणे ओळखून रेतनाची वेळ निश्चित करणे महत्त्वाचे आहे. प्रमाणित व गुणवत्तापूर्ण सिमेनचा वापर केल्यास पुढील पिढीची दूध उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होते. जनावरांचे आरोग्य,योग्य प्रजनन व्यवस्थापन आणि सकस आहार यांचा समन्वय साधल्यास दुग्धव्यवसायातील उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उत्पन्न वाढवता येते असेही त्यांनी सांगितले.यावेळी दुध उत्पादक शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. नितीन मार्कंडेय यांनी सविस्तर उत्तरे देवून त्यांच्या मनातील शंका दूर केल्या.याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिनार कुदळे, संचालक दिलीपराव बोरनारे, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, शंकरराव चव्हाण, सुनील मांजरे,गंगाधर औताडे, सुरेश जाधव, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाट तसेच कारखाना ऊस विभागाचे अधिकारी व पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

मोजमाप आणि निरीक्षणातूनच दुग्धव्यवसायात प्रगती

जनावरांचे वजन, शरीराचे तापमान आणि आरोग्य तपासणी या बाबींकडे अनेक पशुपालक दुर्लक्ष करतात. गोठ्यात तापमापी आणि वजन मोजण्यासाठी मोजमाप टेप यांसारखी साधने असणे आवश्यक आहे. जनावरांच्या वजनानुसार खाद्याचे नियोजन आणि नियमित निरीक्षण केल्यास आरोग्यविषयक समस्या वेळीच लक्षात येतात. केवळ अंदाजावर दुग्धव्यवसाय न करता मोजमाप व नोंदींच्या आधारे निर्णय घेतल्यास व्यवसाय अधिक सक्षम होईल.

मार्गदर्शनाची नोंद ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना नोटपॅड, पेन

 कर्मवीर कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी विविध शेती व पूरक व्यवसायांवरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रांमध्ये सहभागी शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स  विसरून जावू नये, त्याची नोंद घेवून त्या टिप्स प्रत्यक्ष व्यवसायात उपयोग करता यावा व कृषी महोत्सवाचा उद्देश सार्थ ठरावा यासाठी सहभागी शेतकऱ्यांना नोटपॅड व पेन देण्यात आले यावरून आयोजकांनी कर्मवीर कृषी महोत्सवाचे अतिशय सूक्ष्म नियोजन केल्याचे सिद्ध होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे