आषाढी एकादशी निमित्ताने श्री गुरुदत्त स्कूल मध्ये रंगला भक्तीचा सोहळा
आषाढी एकादशी निमित्ताने श्री गुरुदत्त स्कूल मध्ये रंगला भक्तीचा सोहळा
आषाढी एकादशी निमित्ताने श्री गुरुदत्त स्कूल मध्ये रंगला भक्तीचा सोहळा

कोपरगाव विजय कापसे दि ५ जुलै २०२५–कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मेडीअम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांनी हरी नामाचा गजर करत दिंडी सोहळा संपन्न झाला

शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी बालवारकरी दिंडीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी डोक्यावर पांढरी टोपी व वारकरी पोशाखात परिधान केला होता विद्यार्थिनींनी रंगबिरंगी नऊवार साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद व वीणाची साथ, ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा रुख्मीनीचा जयघोष करीत शिरसगाव ते खोपडी निघालेल्या दिंडीने सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधन घेतले.

दिंडीत शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वी च्या सुमारे ४५० हुन अधिक बालवारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक आणि हुभेहुब वेशभूषा केल्याचं दिसून आले.

दरम्यान,टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह धोत्रे व खोपडी गावातून ग्रामस्थांनी सहभाग घेतला
हनुमान मंदिरासमोर भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा करत बाल वारकऱ्यांनी ग्रामस्थांना भक्तीचा संदेश दिला. बाल वारकऱ्यां च्या दिंडीत सहभागी होण्यासाठी गावातील महिला व भाविक भक्तांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. खोपडी व धोत्रे गावातील लक्ष्मीनारायण जोडीने दिंडीतील विठुरायाचे पूजन करत स्वागत केले..
खोपडी येथील नवले वस्ती येथील विठुरायाच्या मंदिरात श्री गुरुदत्त संस्थेचे संचालक स्वप्निल भवर यांनी सपत्नीक लक्ष्मीनारायण जोडीने विठुरायाची आरती केली बाल वारकऱ्यांच्या या भक्ती रसात अवघा गाव भक्तिमय झाला होता.शेवटी खोपडी येथे सर्वांना महाप्रसाद देऊन सोहळ्याचा शेवट करण्यात आला.



