आपला जिल्हा

राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या गौतमच्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव       

राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या गौतमच्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव       

राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या गौतमच्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव       

Kopargaon vijay kapse दि २८ नोव्हेंबर २०२६ :- राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या गौतम पब्लिक स्कूलच्या पाच हॉकीपटूंसह राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या कल्याणी वावधाने हिचा व सर्व खेळाडूंच्या प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, संस्थेचे सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, ब्रँच इन्स्पेक्टर नारायण बारे तसेच गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या, न्यू इंग्लिश स्कूल देर्डे-चांदवड व न्यू इंग्लिशस्कूल चे मुख्याध्यापक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

बुलढाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १४ व १७ वर्षांखालील मुलांच्या संघांनी पुणे विभागाचे नेतृत्व केले. यामध्ये १४ वर्षांखालील संघाने विजेतेपद पटकावले, तर १७ वर्षांखालील संघानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या कामगिरीच्या जोरावर १४ वर्षांखालील गटातील अभिषेक चौधरी, ओंकार डोंगरी, शहाजी घुमरे (नाशिक) आणि रणवीर सिंग नागलोट (छत्रपती संभाजीनगर) यांची मध्यप्रदेशातील मदसोर येथे ६ ते १२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर १७ वर्षांखालील गटातील कृष्णा सातपुते (संगमनेर) याची रांची, झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जाहिरात

तसेच शिर्डी येथे २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलची कल्याणी वावधाने (नाशिक) हिने राष्ट्रीय खेळाडू म्हणून सहभाग नोंदविला.या सर्व खेळाडूंना फिजिकल डायरेक्टर रमेश पठारे, इसाक सय्यद राजेंद्र आढाव,महेश गोंडे पर्यवेक्षिका ज्योती शेलार, सर्व हाऊस मास्टर यांचे मार्गदर्शन लाभले.

गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या या यशामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक वाव मिळावा यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळेत अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कुस्ती आणि पारंपरिक खेळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे