आपला जिल्हा

निरोगी पिकांसाठी बीजप्रक्रिया आवश्यक; कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन

निरोगी पिकांसाठी बीजप्रक्रिया आवश्यक; कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन

जोर्वे येथे रासायनिक व जैविक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २८ नोव्हेंबर २०२६ पिकांची उगवण क्षमता वाढविण्यासह रोगांचा प्रादुर्भाव रोखून निरोगी व जोमदार पिकांच्या वाढीसाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. याच उद्देशाने कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथील कृषिदूतांच्या वतीने जोर्वे येथे रासायनिक व जैविक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

जाहिरात

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती अर्चना नवले यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे महत्त्व व फायदे समजावून सांगितले. पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य प्रक्रिया केल्यास बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी होऊन उगवण क्षमता सुधारते आणि रोपांची जोमदार वाढ होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

यावेळी रासायनिक बीजप्रक्रियेसाठी शिफारशीनुसार बुरशीनाशकांचा वापर, तसेच जैविक बीजप्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्मा, रायझोबियम, अझोटोबॅक्टर व पीएसबी यांसारख्या जैविक घटकांचा वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. तसेच बीजप्रक्रियेचे योग्य प्रमाण, पद्धत, सुरक्षितता आणि प्रक्रिया केलेल्या बियाण्यांची हाताळणी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रतिनिधी तथा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. राहुल खुळे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. साजन हिंगोणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जोर्वे अमृतवाहिनी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन संजय थोरात, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विठ्ठल काकड, प्रगतिशील शेतकरी सोपान कोल्हे, संजय बोरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषिदूत साहिल लहांगे, चैतन्य नवले, करण पटारे, प्रदीप रंधे, मोहित शिंदे आणि रोहित यादव यांनी केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळून शास्त्रीय पद्धतीने बीजप्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा कृषी अभ्यास कार्यानुभव कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या सचिव शरयूताई देशमुख, मुख्य प्रशासक डॉ. संदीप निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर, शैक्षणिक प्रमुख प्रा. रवींद्र दसपुते, डॉ. साजन हिंगोणेकर तसेच इतर प्राध्यापक व विषयतज्ज्ञांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे