आपला जिल्हा

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक-शिक्षक-विद्यार्थी समन्वय महत्त्वाचा

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक-शिक्षक-विद्यार्थी समन्वय महत्त्वाचा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कला शाखेचा पालक मेळावा उत्साहात

Kopargaon vijay kapse दि १८ सप्टेंबर २०२६– : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता ११ वी व १२ वी कला शाखेतील विद्यार्थ्यांचा पालक मेळावा प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

जाहिरात

यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य श्री. रवींद्र हिंगे, पर्यवेक्षक श्री. माधव रेवगडे तसेच सरळसेवा भरतीपूर्व प्रशिक्षण समितीचे चेअरमन श्री. संदीप शिंदे उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा तसेच प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांची मेहनत या तिन्ही घटकांचा समन्वय महत्त्वाचा आहे. कला शाखा ही केवळ पारंपरिक शिक्षणाची शाखा नसून कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारी शाखा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी व क्षमतेनुसार क्षेत्राची निवड करून त्यामध्ये उज्ज्वल करिअर घडवावे.”

जाहिरात

यावेळी पालक प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर गायकवाड, सौ. सुरेखा दाभाडे, श्री. संतोष विधाटे व श्री. दीपक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना व अपेक्षा मांडल्या. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद व समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक प्रभावी दिशा मिळू शकते, असा सूर पालकांच्या मनोगतातून व्यक्त झाला.

मेळाव्यास पालक, विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागप्रमुख श्रीमती कलावती देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री शेंडगे व  संदीप सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन  सुनील चव्हाण यांनी मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे