आपला जिल्हा

युवा क्रांती फाउंडेशनच्या महामेळाव्याचे आयोजन : रविंद्र सुर्यवंशी

युवा क्रांती फाउंडेशनच्या महामेळाव्याचे
आयोजन : रविंद्र सुर्यवंशी

सामाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार वितरण होणार आहे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० जुन २०२५ : समाजामध्ये अद्यापही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अन्याय अत्याचाराच्या घटना होत असतात परंतु हे निवारण करण्याचे काम सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेले युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण तसेच माहिती अधिकार संघटनेच्या माध्यमातून केले जाते त्यामुळे समाजातील गुणवंत व्यक्तींना पुरस्कार देण्याचे व पदाधिकारी महामेळाव्याचे आयोजन दि. २१ जून २०२५, वार शनिवार रोजी सकाळी ९:३० वा.शुभारंभ लॉन्स व मंगल कार्यालय, निघोज -निमगाव, शिर्डी येथे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे.

जाहिरात

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की युवा क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक काम केले जाते या सामाजिक कामातून व्यक्तीना प्रेरणा मिळावी याकरता उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देणे हे संस्थेचे आद्य कर्तव्य असल्याने या महामेळाव्यास आयोजन केले असून याप्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय मार्गदर्शक डी जी.पाटील ,राष्ट्रीय संपर्कप्रमुख उमेश श्रीवास्तव, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आनंदराव पगार, स्वामी राजेश्वरानंद सरस्वती बालयोगी महाराज,हभप नाना महाराज कापडणीस,बृहन्मुंबईचे पोलीस अधिकारी देविदास लाड, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, समाजसेवक कैलास चौधरी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसुधा नाईक, राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री अहिरे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

जाहिरात

युवा क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी या नात्याने ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण, पोलीस मित्र व माहिती अधिकार कायदा संदर्भात माहितीचे काम करण्यात येत असून विषयी ग्राहकांच्या अडी अडचणी सोडवणे, ज्या ग्राहकांची व्यवसाय, मध्ये किंवा इतर ठिकाणी फसवणूक केली जात असेल त्यांना सहकार्य करणे,माहितीचा अधिकार हा कायदा त्याचा वापर कसा करावा आपल्या गावात, शहरात शासनाच्या तिजोरीतून विकास कामासाठी निधी दिला जातो त्यातून विकास कामे केली.

जाहिरात गौतम

त्या कामात भ्रष्टाचार दिसला तर जाब विचारण्याचे माध्यम संघटना आहे पत्रकार समाजात चांगले कार्य करत असता, समाजात काही दृष्ट प्रवृतीचे लोकं त्यांचा आवाज दाबन्याच्या प्रयत्न करत असता त्यावेळेस त्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पत्रकारास संरक्षण देणे असे समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार वितरण देऊन सन्मानित करण्यात येणार असून राज्यातील सर्व युवा क्रांती फाउंडेशनचे अधिकारी,पदाधिकारी सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष गणेश आदमने व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष भाग्यराम गुजर यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे