सीए श्वेता कोठारी यांचे के. जे. सोमय्या महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व्याख्यान

सीए श्वेता कोठारी यांचे के. जे. सोमय्या महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व्याख्यान
सीए श्वेता कोठारी यांचे के. जे. सोमय्या महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व्याख्यान

Kopargaon vijay kapse दि १५ जुलै २०२६ : के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.
यावेळी प्रमुख वक्त्या सीए श्वेता कोठारी यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगार व व्यावसायिक संधींची सविस्तर माहिती दिली. चार्टर्ड अकाउंटन्सी हा वाणिज्य शाखेतील अत्यंत प्रतिष्ठेचा अभ्यासक्रम असून तो पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी सांगितले.

सीए अभ्यासक्रमाद्वारे अकाउंटन्सी, टॅक्सेशन, जीएसटी, इन्कम टॅक्स, ऑडिटिंग, कॉस्टिंग आणि लॉ या विषयांचे सखोल ज्ञान मिळत असल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात सीए व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. तसेच स्वतःची प्रॅक्टिस सुरू करून स्वतंत्र व्यवसायही करता येतो. त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची निवड करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. संतोष पगारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

प्रा. डॉ. रवींद्र जाधव यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. अजित धनवटे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. संजय आरगडे, प्रा. विजय सोमासे, प्रा. सुनील गुंजाळ, प्रा. स्वागत रणधीर, प्रा. सोनाली आव्हाड, प्रा. हर्षदा पेडणेकर तसेच वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



