आपला जिल्हा

सोमैया महाविद्यालयात  ‘महिलांचे कायदेशीर हक्क आणि सुरक्षितता’  या विषयावर विशेष व्याख्यान सत्र संपन्न

 सोमैया महाविद्यालयात  ‘महिलांचे कायदेशीर हक्क आणि सुरक्षितता’  या विषयावर विशेष व्याख्यान सत्र संपन्न

महिलांनी हक्कांबाबत जागरूक राहून निर्भयपणे आवाज उठवावा – ॲड. राजश्री शिंदे

Kopargaon vijay kapse दि १५ जुलै २०२६ : के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांचे कायदेशीर हक्क आणि सुरक्षितता’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विजय ठाणगे उपस्थित होते.

जाहिरात

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ॲड. राजश्री शिंदे यांनी महिलांचे घटनात्मक व कायदेशीर हक्क, कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (POSH), सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, महिला हेल्पलाइन तसेच अन्याय झाल्यास उपलब्ध असलेल्या कायदेशीर उपाययोजनांविषयी विद्यार्थी-विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थिनींमध्ये कायदेशीर साक्षरता, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सायली भावसार यांनी केले, तर प्रा. वर्षा आहेर यांनी प्रमुख वक्त्या, अध्यक्ष, प्राध्यापक, कर्मचारी व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नीता शिंदे, प्रा. सौ. खंडीझोड, प्रा. वहाडणे, प्रा. सौ. वाकचौरे, प्रा. हर्षदा गवळी, प्रा. कर्डिले आणि प्रा. घुगे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे