Kopargaon vijay kapse दि १४ जुलै २०२६–आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम या जयघोषात मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांची आमदार विवेक कोल्हे यांनी चरणसेवा करत त्यांच्या पायांना औषधी तेलाने मालिश करून सेवा केली. भक्ती, समर्पण आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या सेवेबद्दल वारकरी भाविकांनी समाधान व्यक्त केले.जाहिरात
शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना सतत चालल्यामुळे पायांना वेदना, सूज आणि थकवा जाणवतो. ही बाब लक्षात घेऊन आमदार विवेक कोल्हे यांनी वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेलाने मालिश करून त्यांच्या सेवेत स्वतः सहभाग घेतला. वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे उपस्थित वारकऱ्यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.संजीवनी युवा प्रतिष्ठानची रुग्णवाहिका व डॉक्टर यांच्यावतीने मोफत गोळ्या औषधे वाटप करून रुग्णसेवा करण्यात आली.पावसापासून संरक्षण होण्यासाठी घोंगटा वाटप केले.जाहिरात
यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रवासाची विचारपूस केली तसेच सुखरूप वारी पूर्ण होऊन सर्वांना विठ्ठल-रुक्मिणीचे मंगल दर्शन लाभावे, अशी प्रार्थना व्यक्त केली. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुभाव, संयम आणि सेवाभाव शिकवणारी जीवनशाळा असल्याचे त्यांनी सांगितले.जाहिरात
संजीवनी युवा प्रतिष्ठान दरवर्षी हा उपक्रम राबवत असून या सेवाभावी उपक्रमात अनेक युवासेवकांनी सहभाग घेत वारकऱ्यांची सेवा केली. वारकरी संप्रदायाची ही अखंड परंपरा समाजात माणुसकी, प्रेम आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ करणारी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
आमदार विवेक कोल्हे यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे वारकरी, नागरिक आणि उपस्थित भाविकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. सेवा हाच खरा धर्म या संदेशाला साजेसा हा उपक्रम ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
ह.भ.प. संगीताताई करंजीकर व ह.भ.प. हर्षाताई जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर – करंजी या सुरू झालेल्या पायी दिंडीतील वारकरी बांधवांच्या सेवेसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानने ही चरणसेवा आयोजित केली होती.या पायी दिंडीचा मुक्काम मा. दिनकर अण्णासाहेब पाटील आगवण यांच्या राहुरी येथील निवासस्थानी होता.