सोमैया महाविद्यालयात आयबीपीएस बँकिंग कार्यशाळा
सोमैया महाविद्यालयात आयबीपीएस बँकिंग कार्यशाळा
सोमैया महाविद्यालयात आयबीपीएस बँकिंग कार्यशाळा

कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑगस्ट २०२५– विविध सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी तत्पर असावे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आयबीपीएस एक्झाम सारखी दुसरी सोपी व पारदर्शक पद्धती नाही. अभ्यासातील सातत्य व योग्य मार्गदर्शन हे आयबीपीएस परीक्षा उत्तीर्ण होण्याचे अचूक समीकरण आहे. मैदानावर शारीरिक कसरत व मोबाईलचा योग्य व कमी वापर हे तुमच्या यशाचे गमक ठरू शकते.” असे प्रतिपादन संभाजीनगर येथील सारथी एज्यूकेशनचे संचालक मा. अक्षय चोळके यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगावच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वाणिज्य शाखा, विद्यार्थी मार्गदर्शन योजना व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने आयबीपीएस बँकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते. यशस्वरित्या संपन्न झाली.

या प्रसंगी मा. संजित कदम यांनीही विद्यार्थ्यांना बँकिंग परीक्षेतील विविध बारकावे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. आपल्या आई-वडिलांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी व. मान उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकारी झालं पाहिजे असेही ते म्हणाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रो.( डॉ.) संजय अरगडे म्हणाले की, “विविध सॉफ्ट स्किल्स व हार्ड स्किल नोकरी मिळवण्यासाठी किती उपयुक्त आहे याची माहिती दिली.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रो.( डॉ ) वसुदेव साळुंके यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थी मार्गदर्शन योजनेचे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. विजय सोमासे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन जाधव प्रा. गुडघे, प्रा जगधने प्रा. आढाव मॅडम के कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी.प्रा. जगधने, प्रा प्रवीण गुडघे प्रा. सचिन जाधव, प्रा. धनवटे, प्रा. माळी प्रा. सोनवणे मयुरी आवारे प्रा. मानसी चव्हाण प्रा. श्रावणी आढाव व महाविद्यालयाचे रजिस्टर डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी सदिच्छा दिल्या तर वाणिज्य शाखा प्रमुख प्रो. डॉ. संतोष पगारे यांनी विद्यार्थ्यांना बँकिंगच्या विविध परीक्षामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व ऍड.सचिव संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.



