आत्मा मालिक गुरुकुलात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला
आत्मा मालिक गुरुकुलात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला
आत्मा मालिक गुरुकुलात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला

येवला विजय कापसे दि २५ जुन २०२५ :येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलात अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून शनिवार दि २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी ध्यान योग मिशन कोकमठाणचे अध्यक्ष श्री परमानंद महाराज, उपाध्यक्ष संत निजानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज, संत ब्रम्हांडनंद महाराज, संत सार्थकानंद महाराज, बी.ए योगशास्त्र, कैवल्यधाम योग इन्स्टिट्यूट लोणावळा येथील गायत्री उगलमुगले, गुरुकुलाचे उपाध्यक्ष हेमंत शाह , नेहा शाह , प्राचार्य तुषार कापसे उपस्थित होते.

या प्रसंगी गायत्री यांनी योगा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. योग शारीरिक, मानसिक व बौद्धिक संतुलन राखते. योग हे अंतरात्म्यापर्यंत पोहोचण्याच अतिशय प्रभावी साधन आहे. एकच दिवस योग करून ते शिकता येणार नाही, त्यासाठी सातत्याने सराव करणे देखील गरजेचे आहे तरच त्याचा फायदा आपल्या शरीराला,मनाला व बुद्धिला होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आसनाची कृती करून दाखवली त्यात पद्मासन, भ्रामरी ,पर्वतासन ,अनुलोम- विलोम आदी योगा आसन शिकवले.

संत परमानंद महाराज यांनी देखील ध्यानाचे महत्त्व सांगितले ध्यान आणि योग हे नियमितपणे केल्याने आपले शरीर व मन सुदृढ राहते. गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर ८ वी व ९ वी मधील विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक प्रसाद भोई यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार व योगा प्रात्यक्षिक सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पवार, प्रास्ताविक भाग्यश्री खानापुरे यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार सतीश जाधव यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



