संगमनेर

महिला दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेत १०५० महिलांचा सहभाग; डॉ.जयश्री थोरात यांनी केली क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या तयारीची पाहणी

महिला दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेत १०५० महिलांचा सहभाग; डॉ.जयश्री थोरात यांनी केली क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या तयारीची पाहणी
महिला दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेत १०५० महिलांचा सहभाग; डॉ.जयश्री थोरात यांनी केली क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या तयारीची पाहणी

संगमनेर विजय कापसे दि ६ मार्च २०२४जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशनच्या वतीने संगमनेर शहर व तालुक्यातील महिलांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये ९० क्रिकेट संघाच्या सहभागासह १०५० महिला सहभागी होणार असून या स्पर्धेच्या जय्यत तयारीची पाहणी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.

जाहिरात
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ ते १० मार्च २०२४ या काळात महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. यासाठी मैदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून या मैदानाची व तयारीची पाहणी कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केली. यावेळी समवेत डॉ.वृषाली साबळे,  ज्योती थोरात, सुरभी मोरे, प्राजक्ता घुले,विशाखा पाचोरे, शर्मिला हांडे, स्वामिनी वाघ, अहिल्या ओहोळ,डॉ.सुरभी असोपा, तृष्णा आवटी, मयुरी थोरात, पूजा थोरात, शिल्पा गुंजाळ, ऐश्वर्या वाकचौरे ,शीला पंजाबी ,मुख्याधिकारी श्रीराम कु-हे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ९० संघांचा सहभागा असून या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे,कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात,  सुवर्णाताई मालपाणी,  शरयू देशमुख आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेबरोबरच महिलांची आरोग्य तपासणी ही या ठिकाणी होणार आहे. यावेळी नामवंत स्री रोग तज्ञ व कॅन्सर तज्ञ उपस्थित राहून महिलांची तपासणी करणार आहेत.

जाहिरात

संगमनेर तालुक्यातील खेडोपाडी तसेच संगमनेर शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये महिलांचा क्रिकेट उत्साह मोठा दिसून येत असून यासाठी गावोगावी महिलांची प्रॅक्टिस सुरू आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ७७७७ द्वितीय बक्षीस ५५५५ व तृतीय बक्षीस ३३३३ ठेवण्यात आले असून लहान गट ,मोठा गट व खुला गट असे तीन गट मधून हे सर्व बक्षिसे दिले जाणार आहेत .त्याचबरोबर मोफत लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले असून लकी ड्रॉची कुपनही स्पर्धेच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.

तरी महिला दिनानिमित्त होणाऱ्या आरोग्य शिबिर व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि रस्सीखेच स्पर्धेसाठी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.जयश्रीताई थोरात व एकविरा फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

 

महिला आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाच्या स्वतंत्र दालनामध्ये येणाऱ्या सर्व महिला भगिनींची तज्ञ स्री रोग तज्ञ व कॅन्सरतज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये विविध तपासण्या होणार असून अधिक उपचार व पुढील तपासणी करता एसएमबीटी क्लिनिकच्या माध्यमातून उपचार केले जाणार असल्याचे  या शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे