संगमनेर

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ; तालुक्याच्या आर्थिक विकासात कारखान्याचे योगदान मोठे – आमदार थोरात

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ; तालुक्याच्या आर्थिक विकासात कारखान्याचे योगदान मोठे – आमदार थोरात
थोरात कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ; तालुक्याच्या आर्थिक विकासात कारखान्याचे योगदान मोठे – आमदार थोरात
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १३ नोव्हेंबर २०२४कारखाना हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक बैलगाडी ते गिअर अशी अनेक चाके फिरत असतात. या सर्वांना परमेश्वराचा आशिर्वाद आवश्यक असतो. कारखान्याने ऊस उत्पादक,शेतकरी,व्यापारी या सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याबरोबर तालुक्याच्या आर्थिक विकासात मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे बोलत होते.यावेळी मा.आ.डॉ. सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, रणजीत सिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, व्हा.चेअरमन संतोष हासे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, राजेंद्र गुंजाळ, सुहास आहेर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर कारखान्यासह सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य माणसाच्या जिवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकारी संस्थांनी मोठे काम केले आहे. यावर्षी तालुक्यासह सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने हे आर्थिक वर्ष शेतकऱ्यांसह सर्वांना चांगले जाणार आहे.

ऊस उत्पादन जास्त होऊन विक्रमी गाळप करण्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचे आहे. या सर्व वाटचालीत परमेश्वराचे आशिर्वाद ही महत्त्वाची असतात. कारखान्यावर शेतकरी ऊस उत्पादक व कार्यक्षेत्राबाहेरी ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास असून हा गळीत हंगाम यशस्वी होऊन सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. तर मा.आ.डॉ तांबे म्हणाले की, महाराष्ट्रात सहकार चळवळीने ग्रामीण विकासात मोठे काम केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम राज्यातील नव्हे तर देशातील सहकारासाठी मार्गदर्शक काम केले असल्याचे ते म्हणाले. तर बाबा ओहोळ म्हणाले की यावर्षीचा हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख कामगार यांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे असे आवाहन केले.

यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, रामदास पा.वाघ, रोहिदास पवार,रमेश गुंजाळ, संपतराव गोडगे,भास्कर आरोटे, मिनानाथ वरपे, अभिजीत ढोले, विनोद हासे,अनिल काळे, सेक्रेटरी किरण कानवडे,ॲड.शरद गुंजाळ आदींचा सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा.चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे