जागतिक महिला दिन विशेष सौ.दुर्गा सुधीर तांबे
जागतिक महिला दिन विशेष सौ.दुर्गा सुधीर तांबे
जागतिक महिला दिन विशेष सौ.दुर्गा सुधीर तांबे
संगमनेर विजय कापसे दि ८ मार्च २०२४–संपूर्ण जगामध्ये ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील इतिहासात स्त्रियांना कुठलेही हक्क सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी कोणी ना कोणी समाजसुधारकांनी त्यासाठी तीव्र लढा दिला व त्यातूनच जगभर आज स्त्रियांना समानता, स्वतंत्र,मतदानाचा अधिकार त्यातूनच राजकारण समाजकारण धार्मिकता यात प्रवेश मिळाला आहे. म्हणूनच नवनवीन येणाऱ्या प्रश्नांसाठी महिलांना अजूनही संघटित होऊन लढावे लागणार आहे. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रि कामगारांनी रूटगर्ल्स चौकात निदर्शने केली.
कामगार स्त्रियांच्या मागण्या होत्या की, कामाचे तास कमी करून दहा तास ठेवावे. वेतन वाढ द्यावी. कामाच्या जागी सुरक्षितता असावी. या मागण्यांबरोबर लिंग,वर्ण, मालमत्ता, शैक्षणिक पार्श्वभूमी व मतदानाचा हक्क असावा अशा मागण्यांची चळवळ तेव्हापासून सुरू झाली. यानंतर 08 मार्च 1910 रोजी डेन्मार्क मधील कोपन हेगण या राजधानीच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिलांची परिषद भरली. त्याचे नेतृत्व वलारा झेटकीन या कम्युनिस्ट महिलेने केले. 17 देशांचे प्रमुख 100 महिलांनी यात भाग घेतला होता. त्यात महिलांना समानता, समान वेतन, कामाचे कमी तास, महिलांना शिक्षण, आरोग्य, मालमत्तेच हक्क, कामाच्या जागी सुरक्षितता, मतदानाचा हक्क इत्यादी ठराव मांडण्यात आले. त्यातच 08 मार्च हा दिवस कामगार महिलांनी केलेल्या मागण्यांचे आंदोलनाचे स्मरण म्हणून हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा करावा असे कम्युनिस्ट नेत्या वलसारा झेट किन यांनी मांडला व मंजूर करण्यात आला. तेव्हापासून जगातील त्या दिवसाचे महत्त्व वाढले. यानंतर या चळवळीमुळे 1918 इंग्लंडमध्ये 19 19 मध्ये अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
त्यानंतर 1975 साली आपली जागतिक संघटना युनोने त्यात पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात सुरुवात झाली. 1975 हे वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्याची जाहीर केले. त्यात वर्षभरासाठी एक संकल्पना जाहीर करून ते वर्षभर ते राबावे असे जाहीर केले. त्याप्रमाणेच तीन रंग महिला दिनासाठी जाहीर केले जांभळा रंग म्हणजे न्याय व प्रतिष्ठा, हिरवा रंग म्हणजे अशा, आणि पांढरा रंग म्हणजे पावित्र्य अशा संकल्पना मांडल्या.
तेव्हापासून संकल्पनेने नुसार महिला दिन साजरा होऊ शकला महिला दिन फक्त ८ मार्च रोजी साजरा न करता १ मार्च ते 31 मार्च पर्यंत चालतो. नवीन वर्षाची दिलेली संकल्पना वर्षभर राबवायची असते. यावर्षी संकल्पना आहे महिलांच्या समावेशस प्रेरणा देणे. समानतेतील अडथळे तोडण्यासाठी रुढीवादी परंपरांना आव्हान देण्यासाठी या वर्षाची संकल्पना आहे. यावर्षीचा रंग आहे जांभळा लैंगिक समानता महिला आणि मुलींचे सक्षमीकरण, निरोगी जीवनासाठी आरोग्य सुविधा, आर्थिक समानता यासाठी ही संकल्पना आहे.
युनोने WHO (जागतिक आरोग्य संघटना) यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे महिलांचे मृत्यूचे प्रमाण घटत आहे. WHO ही जागतिक आरोग्य संघटना जगाला आजारापासून व इतर सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी नागरिकांचे आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते. महिलांसाठी ही आरोग्य संघटना खूप काम करते. आणि म्हणून सर्व महिलांनी युनो W.H.O ( आरोग्य संघटना ) आपल्याला रोज कायम सांगते त्याचा अभ्यास आपण करून तशा प्रकारचे प्रशिक्षण तळागाळातील स्त्रियांपर्यंत पोहोचवणे म्हणजे खरा महिला दिन. भारतीय स्त्रिया खूप भाग्यवान आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे संविधानाने अनेक हक्क न मागता मिळालेले आहेत. मतदान मालमत्ता इत्यादी अधिकार मिळाला. हिंदू कोड बिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सर्व जाती धर्मातील महिलांना जाचक रूढी परंपरा पासून सुटका व्हावी, घटस्फोटीत महिला विधवा महिलांचे जीवन भयानक व अपमानित होते. त्यातून त्यांचे जीवन इतर महिलांसारखे मानवी मूल्यातून व्हावे. विधवा परिचकता स्त्रियांना पुनर्विवाह असे ठराव मंजूर करण्यात आले. त्यासाठी विरोध झाला पण त्यांनी हे काम सर्व जाती धर्मातील स्त्रियांसाठी केले. त्यासाठी त्यांनी खूप लढा दिला. राजा मोहन राय यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले.
क्रांतीसुर्य महात्मा फुले,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून खूप त्रास, कष्ट सहन केले. छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी खूप मदत केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी सर्व जाती धर्मातील स्त्रियांना समानता देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, यांनी स्त्रियांना सन्मानाची आदराची वागणूक दिली. सुरक्षितता दिली. मधल्या काही वर्षात सोनोग्राफी मुळे मुलींची जन्म पूर्वीच हत्या करण्यात आली. मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलगी असेल तर गर्भपात करण्यात आले. त्यातून पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या समानता राहिली नाही व आपण आज भारतात अनेक तरुणांचे लग्न होत नाही. कारण मुलीच नाही म्हणून इतर भयानक प्रकार समाजात वाढले त्यासाठी गर्भपातावर कठीण शिक्षा झाल्याने हे प्रमाण थोडे कमी झाले. आज स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले. परंतु स्त्रियांना परत धार्मिकेकडे नेत्यांचा समाज कंटकांचा प्रयत्न आहे. यासाठी स्त्रियांनी जागृतीने डोळसपणे अभ्यास करून ही नवीन बंधने जुगारून दिली पाहिजे. आपल्या सर्वांनी एकमेकीचा आदर सन्मान केला पाहिजे. एकमेकींची काळजी घेतली पाहिजे. महिला दिन फक्त ८ मार्चलाच एक दिवस न करता ही संकल्पना सांगितलेली आहे ती वर्षभर राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला समाज सुधारकांच्या कष्ट त्रास जगातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याचे आहे.
जसा बैलपोळा एकच दिवस साजरा होतो व वर्षभर बैलांकडून त्याला चापकाने मारून काम करून घेतो तसे महिला दिन एकच दिवस साजरा न करता स्त्रियांसाठी मुलींसाठी वर्षभर अनेक संघटना स्त्रियांनी सक्षमीकरणाचे काम चालू ठेवले पाहिजे. कुटुंबांमधून समाजात त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आता आपण रोजच महिला दिन साजरा करून महिलांना अधिक सक्षम बनवूया महिला वर्षभरासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
सौ.दुर्गा सुधीर तांबे
मा. नगराध्यक्ष संगमनेर
व अध्यक्ष- जयहिंद महिला मंच
9822553254