के.जे.सोमैया महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
के.जे.सोमैया महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
के.जे.सोमैया महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२४– कोपरगाव येथील के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित या दिनाच्या कार्यक्रमाचे उद्धाटन प्रमुख पाहुणे डॉ. रजनी पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या दिनाच्या निमित्ताने ‘महिला सबलीकरण काळाची गरज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी मालेगांव येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रजनी पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मनोगतात जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी नमूद करतांनाच समाजात महिलांची जबाबदारी मोठी असुन गुणवत्ता व कर्तुत्वाने आपण समाजात वावरले पाहीजे. शिक्षणाची कास धरून महिला सबलीकरण होण्याबरोबरच स्त्री-पुरुष समानतेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्रो.(डॉ.) विजय ठाणगे म्हणाले कि आजच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने महिला विविध क्षेत्रात निर्भयपणे काम करत असून महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी समाजप्रबोधनाची, जनजागृतीची व सहकार्याची गरज असल्याचे नमूद केले.
महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात सर्व महिला प्राध्यापक, यशस्वी विद्यार्थिनी व महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सर्व महिला कर्मचारी यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख डॉ. नीता शिंदे यांनी महिला सबलीकरण कक्षाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी काळे यांनी तर आभार प्रा. वर्षा आहेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सुरेखा भिंगारदिवे, प्रो.(डॉ.)जे.एस.मोरे, डॉ. संजय दवंगे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या.