आत्मा मालिक गुरुकुल येवल्याचे आत्माविष्कार स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक समारंभ जल्लोषात
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली
येवला विजय कापसे दि १० मार्च २०२४- नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील आत्मा मालिक गुरुकुल मधील विद्यार्थ्यांचे “आत्माविष्कार स्नेहसंमेलन” व वार्षिक पारितोषिक समारंभ पाणी व पर्यावरण अभ्यासक सतीश खाडे, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक ,संस्थेचे विश्वस्त हरिभाऊ गिरमे, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे सरचिटणीस तथा पुरणगाव गुरुकुलचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे या सह हेमंत शाह, डॉ.पहिलवान ,संत सुदर्शननंद महाराज, संत सार्थकनंद महाराज,संत भोलेनाथ, कंकाली बाबा, सेवादास, प्राचार्य योगेश सोनवणे , नेहा शाह, वंदना शिंपी , नीता दीदी, तुषार कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले व सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली होती. इयत्ता नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तर स्कॉलरशिप परीक्षेत प्राविण्य मिळालेल्या इयता पाचवी तील विद्यार्थी साईमाणिक रायजादे, इयता आठवी तील भक्ती जगताप,पार्थ महाजन या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आले. राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेमध्ये श्रुती बोडके हिने प्राविण्य मिळवले त्यामुळे तिचाही सत्कार करण्यात आला.सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत महाराष्ट्र आणि गोवा झोन मध्ये गणित विषयात क्रमांक चौथा स्थानावर उत्तीर्ण झालेल्या तनिष तुषार कापसे व शौर्य कंदलकर अशा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या आत्मविष्कार मध्ये गुरुकुलच्या नर्सरी ते नववीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उपस्थितांची मने जिंकली. त्यात आत्म्याचे गाणं ,श्रीकृष्ण व सुदामा यांची मैत्री,रामायण थीम असे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य सादर केले.तसेच गुरुकुलाच्या महिला पालकांनी झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा गाण्यात सहभाग घेतलेला होता. गुरुकुलाच्या शिक्षिकांनीही राम आयेंगे तो दीप जालाऊंगी या या गाण्यावर नृत्य सादर केले.