अमळनेर विजय कापसे दि १२ मार्च २०२४– अमळनेर तालुक्यातील दहिवद गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सुषमा वासुदेव देसले यांना नुकताच लोकमत वृतपत्र समूहाच्या वतीने “पॉवरफुल वुमन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सुषमा वासुदेव देसले-पाटील यांनी दहिवद गावच्या प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंचपदी, विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुबई , संचालक कृषी उत्पन्न बाजारसमिती अमळनेर या पदावर अतिशय उत्कृष्ट काम करत सामान्य जनतेचे तसेच महिला हिताचे कामे केली असून, महिला साबलीकरण , मेगा वृक्षारोपण , जिप प्राथमिक शाळा सुधारणा व विकास कार्य , पाणी समस्या आरोग्य व शेतकरी हिताचे यावर प्रामाणिक पारदर्शक प्रभावी कार्य केली असून त्यांचा या कार्याची दखल घेत लोकमत वृतपत्र समूहाचे वतीने “पॉवरफुल वुमन” हा पुरस्कार नाशिक विभागातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांचे उपस्थितीत , सुप्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी , जयंती कठाले, नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे शुभ हस्ते होटल ताज गेटवे नाशिक येथे प्रदान करण्यात आला.
सुषमाताई याना यापूर्वी असंख्य संस्था,संघटना, मंच यांचेकडून त्यांचे कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. सुषमाताई याना प्राप्त “पॉवरफुल वुमनपुरस्कार “बद्दल त्यांचे नामदार अनिल पाटील, सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाउ काकडे , अमळनेर बाजार समितीचे अशोक पाटील यांचेसह असंख्य मान्यवरांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.