काळे गट

धारणगाव रस्त्याचे काम निकृष्ट, रस्त्यावर पडले खड्डे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भर उन्हात आंदोलन

धारणगाव रस्त्याचे काम निकृष्ट, रस्त्यावर पडले खड्डे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भर उन्हात आंदोलन

धारणगाव रस्त्याचे काम निकृष्ट, रस्त्यावर पडले खड्डे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भर उन्हात आंदोलन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ मार्च २०२४ :- ज्याप्रमाणे आ. आशुतोष काळे यानी मतदार संघातील रस्ते विकसित करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे त्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या रस्त्यांना देखील मोठा निधी दिला आहे. परंतु दिलेल्या निधीतून ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ठ केल्यामुळे रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्याबाबत कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलन करीत याकडे पालिकेचे लक्ष वेधले आहे.

जाहिरात

कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दाखविलेले विकसित कोपरगावचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कोपरगाव शहरात येणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांना निधी दिला आहे. यामध्ये शहराच्या पश्चिम भागातील अतिशय महत्वाचा असणारा धारणगाव रोड ते कोपरगाव बस स्थानक या रस्त्याचा देखील समावेश आहे.  या रस्त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी तब्बल दोन कोटी निधी दिला आहे मात्र सबंधित ठेकेदाराने  या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ केल्यामुळे दोन वर्षाच्या आतच या रस्त्यावर पोस्ट ऑफिसजवळ अतिशय मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघातांना आमंत्रण देत असल्यामुळे हा खड्डा चुकविण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात होण्याची संख्या वाढली होती.

जाहिरात

त्यामुळे नागरिकांना त्रास सहन  करावा लागत होता. नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी हा खड्डा तातडीने बुजवण्यात यावा यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवार (दि.१२) रोजी भर दुपारी रस्त्यावर उन्हात बसून आंदोलन करून उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांना निवेदन देण्यात आले आहे. सबंधित ठेकेदाराला सूचना करून लवकरात लवकर पडलेला खड्डा बुजविण्यात येईल अशी ग्वाही कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे