गेल्या दहा वर्षापासून सचिन कोळपे वापरतात वडिलांच्या आगोदर आपल्या आईचे नाव
शासनाच्या निर्णयाचे सचिन मीरा नामदेव कोळपे यांनी केले स्वागत
कोपरगाव विजय कापसे दि १२ मार्च २०२४–नुकताच राज्य शासनाकडून जागतिक महिला दिनी जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये वडिलांबरोबर आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद असून सर्व स्तरातून या निर्णयाचे कौतुक होत आहे.
परंतु कोपरगाव तालुक्यातील सुरेगावचे माजी सरपंच तथा पत्रकार सचिन मिरानामदेव कोळपे हे गेल्या दहा वर्षापासून आपल्या सार्वजनिक जीवनात तसेच सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश देण्यासाठी आपल्या वडिलांच्या अगोदर आपल्या आईचे नाव वापरत असून त्यांच्या आई मिराबाई नामदेव कोळपे या गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालक आहे. कोळपे हे गेल्या दहा वर्षापासून आपल्या आईचे नावाला सार्वजनिक जीवनात कार्य करत असताना वडिलांच्या बरोबरीने सन्मान देत गौरव करत असल्याने,
त्यांचे नेहमीच सर्वत्र कौतुक होत आहे तर त्यांच्या या उल्लेखनीय बाबी बद्दल प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई अशोकराव काळे व जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका चैतालीताई आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे तर शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सचिन मिरानामदेव कोळपे यांनी देखील कौतुक करत शासनाचे अभिनंदन केले आहे.