येवला गुरुकुलात महिला दिनानिमित्त सुपर मॉम कॉम्पिटिशन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.
येवला गुरुकुलात महिला दिनानिमित्त सुपर मॉम कॉम्पिटिशन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
येवला गुरुकुलात महिला दिनानिमित्त सुपर मॉम कॉम्पिटिशन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.
येवला विजय कापसे दि १३ मार्च २०२४–विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे नारीशक्तीचा सन्मान करत महिला दिन साजरा करण्यात आला. गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून हा कार्यक्रम साजरा झाला. या प्रसंगी भाग्यश्री खानापुरे व प्राचार्य तुषार कापसे यांनी सर्व महिलांचा,माता पालकांचा सन्मान करत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे.ही खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले.
ती आहे म्हणून सारे विश्व आहे.ती आहे म्हणून सारे घर आहे. ती आहे म्हणून सुंदर नाती आहे.आणि केवळ ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे.अशा मनाला भिडणाऱ्या शब्दांमध्ये महिलेचा गौरव झाला. महिला दिनाचे औचित्य साधून गुरुकुलामध्ये माता पालकांसाठी विविध खेळ घेण्यात आले. एकूण ६० माता पालकांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता.संगीत खुर्ची, सामान्य ज्ञान प्रश्न, उखाणे, बॉल बादलीत टाकणे, चिठ्ठी निवडून त्यात लिहिलेल्या विषयावर बोलणे. असे विविध खेळ घेण्यात आले.या खेळांमधून ३ नंबर काढण्यात आले व एक उत्तेजनार्थ बक्षीस दिले.
यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला पूनम घाटकर (सुपर मॉम) द्वितीय क्रमांक सोनाली कोटमे तृतीय क्रमांक सुप्रिया पैलवान आणि उत्तेजनार्थ पल्लवी कंदलकर विजेत्या माता पालकांना गुरुकुलाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता हेडगिरे व सोनाली घोडके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाचे सहकार्य लाभले.