संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या चार अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन मध्ये वार्षिक पॅकेज साडे पाच लाखांवर नोकरीसाठी निवड
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या चार अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन मध्ये वार्षिक पॅकेज साडे पाच लाखांवर नोकरीसाठी निवड
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामुळे नवोदित अभियंत्यांना वयाच्या २२ व्या वर्षी लाखोंचे पॅकेज
कोपरगांव विजय कापसे दि १३ मार्च २०२४: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने अंतिम वर्षातील चार नवोदित अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली. अशा प्रकारे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे नवोदित अभियंते वयाच्या २२ व्या वर्षी लाखोंचे वार्षिक पॅकेज मिळविण्यास पात्र होत आहे. मागिल वर्षी टी अँड पी विभागाच्या प्रयत्नाने सुमारे ७७० अभियंत्यांना त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकऱ्या मिळाल्या होत्या, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की रेनाटा प्रिसिझन या विविध वाहन उद्योगांना मेटल व प्लास्टिक मोल्डेड पार्टस् पुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये संजीवनीचे माजी विध्यार्थी अभियंते म्हणुन कार्यरत असुन त्यांचे उत्तम योगदान आहे. या अनुषंगाने या कंपनीने पुन्हा चालु वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या प्रसाद राजु भामरे व ओमकार रानाविश्वासिन्हा राठोड यांची तर मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या पायल राजेंद्र नवले व आदित्य श्रीक्रिष्णा ऊकिर्डे यांची निवड केली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी चारही नवादित अभियंत्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ. आर. ए. कापगते, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ.पी. एम. पटारे व टी अँड पी विभागाचे डीन डॉ. व्ही. एम. तिडके उपस्थित होते.
‘माझ्या वडीलांचा कोपरगांव येथे प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यावर कॉलेजच्या प्रयत्नानेच चांगल्या कंपनी मध्ये नोकरी मिळते, हे माझ्या वडीलांना माहित होते. म्हणुन त्यांनी मला संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग मध्ये दाखल केले. मला विविध विषयांचे सखोल ज्ञान मिळाले. मी टी अँड पी विभागाचा विध्यार्थी समन्वयक होतो. यामुळे या विभागामार्फत विध्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी करून घेण्यात येणारी तयारी बाबत माहिती होती. समन्वयक या नात्याने संघटन, टीम लिडरशिप , आयोजन व नियोजन हे मला शिकायला मिळाले. या सर्व बाबींमुळे माझी नोकरीसाठी सहज निवड झाली. माझ्या वडीलांनी डोळ्यात साठविलेले स्वप्न मी पुर्ण करू शकलो, याचा मला आनंद आहे.’-नवोदित अभियंता आदित्य ऊकिर्डे