उद्या कोपरगावात मोफत बाल नेत्ररोग तपासणी शिबीर
उद्या कोपरगावात मोफत बाल नेत्ररोग तपासणी शिबीर
जास्तीत जास्त गरजू बालकांनी लाभ घेण्याचे आवाहन
कोपरगाव विजय कापसे दि १३ मार्च २०२४–आनंदऋषिजी नेत्रालय, अहमदनगर, राष्ट्रीय बाल व स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर व समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत आचार्य भगवंत प.पू. श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या ३२ व्या पुण्यस्मृतिदिना निमित्त जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयात ६ मार्च २०२४ ते १९ मार्च २०२४ या कालावधीत मोफत बाल नेत्ररोग तपासणी शिबिर मोहीम आयोजित केली आहे.
त्याच अनुषंगाने उद्या गुरुवार दि १४ मार्च २०२४ रोजी लहान मुलांसाठी (वयोगट ० ते १८ वयोवर्ष) तिरळेपणा, अल्पदृष्टी, पापणी लावणे, जन्मजात मोतिबिंदू अशा विविध बाल नेत्ररोग या समस्यावर मोफत तपासणी, शस्त्रक्रिया व चष्मा वितरण शिबिर ग्रामिण रुग्णालय कोपरगाव येथे आयोजित करण्यात आले असून जास्तीत जास्त गरजू बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
तसेच या तपासणी शिबिरासाठी येताना प्रत्येक पालकाने स्पष्ट दिसेल अशी बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणावी तसेच पालकाचे व मुलाचे आधार कार्ड सोबत असू देणे.